तो जीव वाचवण्यासाठी पळत होता तरी मित्र त्याच्यावर चाकूने करत होता वार (व्हिडीओ)

वापी : पोलीसनामा ऑनलाइन – वापीमधील खुनाचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्रावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटने अगोदर दोघांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाले होते. याच वादातून हा खून केला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खूनाचा थरारक व्हिडीओ समोर आल्यानंतर वापी पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

खुनाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा उलघडा झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुण आपल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये येत असतानाच त्याच्या मित्रानं त्याच्यावर अचानक चाकू हल्ला केला. त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. दरम्यान, त्याचे प्राण वाचवण्यासाठी एक महिला मध्ये येते. ती हल्ला करणाऱ्याला हाताने मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यावरही मारेकऱ्याने चाकुने वार केले. या घटनेमुळे वापी शहरात खळबळ उडाली आहे.

महिला जखमी तरुणाची मारेकरच्या ताडीतून सटका करत असताना तो तेथून जीव वाचवण्यासाठी पळून जातो. मुलगा जखमी अवस्थेत घरी गेल्यानंतर घरच्यांना त्याचेवर वार झाल्याचे समजताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शरिरातून ज्सात प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मृत मुलाचे नाव रोहित असून आरोपी अल्पवयीन मुलाचे आणि त्याचे किरकोळ कारणावरून वाद होते. याच वादातून त्यांच्यामध्ये अनेकवेळा वाद झाले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला. तसेच त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2622707977766429&id=148479338522651

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/