Varandha Ghat Accident | नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कार बुडून तिघांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात सध्या दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने पुणे (Pune Crime News) आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट (Varandha Ghat Accident) सध्या वाहतुकीसाठी बंद (Traffic Stop) केला आहे. मात्र, घाट बंद असताना काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करता वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करत आहेत. वरंधा घाटात शनिवारी (दि.29) सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण अपघात (Varandha Ghat Accident) झाला आहे. वरंधा घाट मार्गे कोकणात (Konkan) जाणारी एक चारचाकी नीरा देवघर धरणाच्या (Neera Deoghar Dam) बॅक वॉटरमध्ये (Back Water) कोसळली. या कारमधून चौघेजण प्रवास करत होते. यापैकी तिघांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.

वरंधा घाटात झालेल्या भीषण अपघातात (Varandha Ghat Accident) अक्षय रमेश धाडे Akshay Ramesh Dhade (वय-27 रा. शिंदे वस्ती, रावेत), हर्षप्रीत हरप्रीतसिंग बांबा Harshpreet Harpreet Singh Bamba (वय-30 रा. पाषाण मुळ रा. रतन क्लोमीनी, जबलपुर, मध्यप्रदेश), स्वप्नील परशुराम शिंदे Swapnil Parasuram Shinde (वय-28 रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत जखमी संकेत विरेश जोशी Sanket Viresh Joshi (वय-28 रा. पाषाण, मुळ रा. वापी, गुजरात) याने भोर पोलीस ठाण्यात (Bhor Police Station) फिर्याद दिली आहे. अक्षय आणि हर्षप्रीत यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. तर स्वप्नील शिंदे याचा अद्याप शोध लागलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि मयत हे एकमेकांचे मित्र आहेत. शनिवार-रविवार सुट्टी असल्याने ते नेहमी एकत्र फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. शनिवारी सकाळी चौघेजण ग्रे रंगाच्या बलेनो गाडी (एमएच 14 एचडी 3984) मधून वरंधा घाटातून महाडच्या दिशेने जात होते. त्यावेळी अक्षय धाडे हा गाडी चालवत होता. सकाळी साडे आठच्या सुमारास भोर-महाड रोडने (Bhor-Mahad Road) जात असताना तीव्र वळणावर अक्षय याने गाडी भरधाव वेगात चालवली.

वळणावर अक्षयचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटीपलटी होऊन 50 मीटर खोल दरीतुन निरा देवघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये जाऊन पडली. यावेळी फिर्यादी संकेत जोशी याने गाडीचा मागील दरवाजा उघडून बाहेर उडी घेतली. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. संकेत याने जखमी अवस्थेत मुख्य मार्गावर येऊन येणाऱ्या लोकांना थांबवून घटनेची माहिती दिली. नागरिकांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यातील पोलिसांना माहिती दिली.

अपघाताची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी,
रेस्क्यू टीम (Rescue Team), आपत्ती व्यवस्थापन टिम
(Disaster Management Team) व गावातील पोहणारे काही लोक घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी पाण्यात बुडालेल्यांचा शोध घेतला.
धरणाच्या पाण्यात बुडालेल्या गाडी मधून अक्षय आणि हर्षप्रीत यांचे मृतदेह बाहेर काढले.
मात्र स्वप्नील याचा शोध लागलेला नाही.
याबाबत संकेत जोशी याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मयत अक्षय धाडे
याच्यावर आयपीसी 279, 337, 338, 304 (अ)स 427 सह मोटार वाहन कलम
(Motor Vehicle Act) 184 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘उद्धव ठाकरेंच्या घरगुती मुलाखतीवर…’ देवेंद्र फडणवीस
यांनी एका वाक्यात विषय संपवला (व्हिडिओ)