अभिनेता वरुण धवन डान्स करताना अचानक बेशुध्द !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार वरुण धवन आपल्या प्रोफेशनमध्ये कठोर मेहनत घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. कोणताही सीन असो तो खूप मेहनत घेताना दिसतो. प्रत्येक गोष्टीत तो जीव ओतून काम करत असतो. सध्या वरुण धवन त्याचा आगामी सिनेमा स्ट्रीट डान्सर ३ डी च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. एका रिपोर्ट्सनुसार, वरुण धवन शुटींगदरम्यान सेटवर बेशुद्ध झाला आहे.

वरुण धवन अचानक बेशुद्ध झाल्याने चांगलाच गोंधळ झाला. वरुण या सिनेमासाठी दिवस-रात्र रिहर्सल आणि शुटींग करत आहे. यादरम्यानचा त्याला ताप आला होता. परंतु वरुणने आराम न करताच डान्स रिहर्सल आणि शुटींग सुरुच ठेवली. या मेहनतीचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला. एक दिवस शुटींग करताना त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला.

एका रिपोर्टनुसार, वरुणने स्वत: आपल्या आजारी असल्याची बातमी सोशलवरून दिली. वरुणला अनेक दिवसांपासून ताप आणि सर्दी होती. स्ट्रीट डान्सर ३ डी ची शुटींग ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यासाठी तो रात्रंदिवस डान्स रिहर्सल आणि शुटींग करत राहिला. त्यामुळे तो थकला आणि त्याला चक्कर आली.

वरुण बेशुद्ध झाल्यानंतर डॉक्टरांनी त्वरीत त्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर समजले की, लो-ब्लड प्रेशरमुळे तो बेशुद्ध झाला होता. डॉक्टरांनी त्याला काही दिवस आराम करण्यासाठी सांगितले. यादरम्यान सिनेमाची शुटींगही थांबवण्यात आली. काही दिवस आराम केल्यानंतर वरुण पुन्हा एकदा शुटींगसाठी आला. त्याने शुटींग पूर्ण केलं. आजारातून उठल्यानंतरही वरुण धवनने डबल शिफ्टमध्ये शुटींग पूर्ण केलं.

वरुणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच वरुण पिता डेविड धवन यांचा हिट सिनेमा कुली नंबर १ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. याआधी तो सुई धागा सिनेमात दिसला होता.

आरोग्यविषयक वृत्त –