अरे वा ! ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन, ‘ज्यूनियर बच्चन’ आणि वरुण धवन चक्‍क एकत्र क्रिकेट खेळतात (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन तेंडुलकर अभिनेता वरुण धवनबरोबर क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. त्यानंतर त्यांना अभिनेता अभिषेक बच्चन याने देखील साथ दिली. सध्या हा व्हिडीओ सोशल मोडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ शेअर करत सचिन तेंडुलकर याने लिहिले कि, खेळ आणि काम दोन्हीही सोबत केल्याने आनंद मिळतो. शूटिंगच्या दरम्यान क्रू मेम्बर्सबरोबर खेळून मजा आली. वरून धवन आणि अभिषेक बच्चन बरोबर खेळून मजा आली. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये दिसून येत आहे कि, सर्वांनी या खेळाचा खूप आनंद घेतला आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन याने यावर ट्विट करताना म्हटले कि, कालपासून मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक दिवसांपासूनचे माझे स्वप्न पूर्ण झाले. आमच्या चेंडूला पार्कच्या बाहेर न मारल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर वरून धवन याने देखील सचिन तेंडुलकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

दरम्यान, त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वरून धवन त्याच्या कुली नंबर १ या आगामी सिनेमात व्यस्त आहे.

आरोग्यविषयक वृत्त –