‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘कलंक’ च्या अपयशाबद्दल पहिल्यांदा अभिनेता वरुण धवनचे विधान समोर आले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आलिया आणि वरुण यांच्या व्यतिरिक्त माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय अशा प्रसिद्ध कलाकारांनी काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालला नाही. प्रेक्षकांना हा चित्रपट आवडला नाही त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटाचे बजेट मोठे होते. करण जोहर यांच्यासह दिग्गज प्रोड्यूसरांनी हा चित्रपट तयार केला होता. तरीही हा चित्रपट अयशस्वी ठरला.

२ तास ४८ मिनिटाच्या या चित्रपटात काही गाणे उगाच टाकले गेले. चित्रपटात अनेक डायलॉग रिपीट झाले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना बोर वाटू लागला. चित्रपटाच्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच वरुण धवन बोलला की, चित्रपट फ्लॉप झाल्याने तो खूप निराश होता. वरुणने स्वतः मान्य केले की, हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालण्याच्या लायकीचा नव्हता. कारण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. वरुण म्हणाला की, ‘प्रेक्षकांनी चित्रपटाला नकार दिला हे माझ्यासाठी मोठी एक शिकवण आहे.’

वरुण पुढे म्हणाला की, कलंक चित्रपटानंतर माी शिकलो की, अनेकदा काही गोष्टी ठिक नसतात. मी पहिल्यांदा अयशस्वी झालो आहे. मी माझ्या पुढच्या चित्रपटाची चांगली तयारी करत आहे. माझे आगामी चित्रपट ‘स्ट्रीट डांसर’ आणि ‘कुली नंबर १’ यासाठी खूप मेहनत घेत आहे. स्ट्रीट डांसर २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

“ऍसिडिटीने” त्रस्त असणाऱ्यांसाठी रामबाण उपाय

फक्त “दारूमुळेच” जगभरात दरवर्षी ६ टक्के लोकांचा मृत्यू

“पॅरालिसिसकडे” दुर्लक्ष करू नका

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like