Vasant More | मनसेच्या शहराध्यक्षपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर वसंत मोरेंचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले….

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी पुणे शहराध्यक्ष (Pune City President) वसंत मोरे (Vasant More) यांची उचलबांगडी करुन नगरसेवक साईनाथ बाबर (Corporator Sainath Babar) यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वसंत मोरे (Vasant More) यांनी गौप्यस्फोट केला आहे. मीच राजसाहेब ठाकरे यांना मला पुण्याच्या शहराध्यपदी रहायचे नसल्याचे सांगितले होते, असे मोरे यांनी सांगितले.

 

वसंत मोरे (Vasant More) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या महिन्यात राजसाहेब पुण्यात आले होते. तेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो. माझी भूमिका त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडली होती. पुण्यातील काही लोकांमुळे पक्ष वाढत नाही, त्रास होतोय. त्यामुळे मी मे महिन्यापर्यंत शहर अध्यक्षपदी राहीन, असे मी राज ठाकरे यांना सांगितल्याचा खुलासा मोरे यांनी केला आहे.

 

आम्ही त्या आदेशाचे पालन करतो
मोरे पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी मला शहर अध्यक्षपदावरुन हटवले म्हणून त्याला माझी हकालपट्टी करण्यात आली असे म्हणता येणार नाही. याआधी अजय शिंदे (Ajay Shinde) यांना शहर अध्यक्षपदावरुन दूर केले होते. तेव्हा कोणी असे बोलले नाही. मनसेत (Pune MNS) आम्हाला आदेश येतो आणि त्या आदेशाचे पालन करावे लागते, असेही त्यांनी सांगितले.

साहेबांची वेळ घेऊन भेटणार
आतापर्यंत माझं कोणाशीही बोलणं झालेलं नाही. मला कोणाचा फोन आला नाही.
मलाही शहर अध्यक्षपदावरुन हटवल्याची माहिती तुमच्याप्रमाणे फेसबुकवरुन समजली.
यादरम्यान मला काही नेत्यांचे फोन आले होते. आपण साहेबांची वेळ घेऊन त्यांना भेटू, असे त्यांनी सांगितले.
यावर तुम्ही वेळ घेऊन सांगा, मी येतो, असे संबंधित नेत्याला सांगितल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Vasant More | i already told raj thackeray that i dont want to be pune city president says vasant more

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा