Vasant More | ‘मी राजमार्गावरच, आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या भोंग्याच्या भुमिकेवरुन मनसेचे माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) नाराज असल्याची चर्चा पसरली. नुकतच औरंगाबादच्या (Aurangabad) सभेनंतर मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र त्यामध्ये वसंत मोरे दिसले नाही. त्यानंतर अनेक बातम्या वाऱ्यागत  पसरल्या होत्या. दरम्यान, आज खुद्द वसंत मोरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

वसंत मोरे (Vasant More) म्हणाले की, ”एखाद्या लढाईला एखादा सैनिक नसला म्हणजे कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते असे वक्तव्य वसंत मोरे यांनी केलं आहे. आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच आणि राजमार्गावरच राहणार असल्याचे,” ते म्हणाले.

 

पुढे वसंत मोरे म्हणाले, ”मी अस्वस्थ, नाराज नाही. पण मी सध्या शांत आहे. माझी मागच्या 4 वर्षात धावपळ झालीय. विविध आंदोलने केली आहेत. पक्षाची बांधणीमध्ये मी काम केले. सध्या कुटुंब आणि व्यवसायाकडे लक्ष देत आहे. माझ्या प्रभागात 6 मशिदी आहेत. त्या भागात सर्वांनी नियमांचे पालन केले आहे. मी त्या लोकांना सांगितल्याप्रमाणे ऐकल्याचे मोरे यांनी सांगितले. मी आजारी पडत नाही, मी आजारी पाडतो असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष ज्यावेळी मोठा होत असतो त्यावेळी पक्षांतर्गत कुरघोडी सुरु असतात. आज आमच्यात थोडे मतभेद आहेत, पण, मनभेद नाहीत. मतभेद असणे जिवंतपणाचे लक्षण असल्याचे,” वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, मशिदीसमोर भोंगे लावण्याच्या राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरे अज्ञातस्थळी गेले होते.
मात्र, त्यांनी माझा बालाजीला जाण्याचा पूर्वनियोजीत कार्यक्रम होता, त्यासाठी मी गेलो असल्याचा खुलासा केला आहे.
”मी दरवर्षी बालाजीला जात असतो. दीड महिन्यापूर्वी बुकींग केले होते. तो माझा पूर्वनियोजीत दौरा होता, त्यामुळे गेलो होते.” असं ते म्हणाले.

 

”आंध्र प्रदेशात बालाजीला गेल्यावर कोणत्याही पक्षाचा झेंडा गाडीला ठेवता येत नाही.
सगळे खाली काढले जाते. त्यामुळे मी भाड्याने गाडी करुन गेलो. पण गाडीवरचा झेंडा खाली उतरवला नाही.
तसेच, पुण्यात पहिल्यादिवशी फटाके वाजवण्याचा जो कार्यक्रम झाला तो मला थोडा खटकला. मिरवणूक काढण्यात आली, पेढे वाटण्यात आले, ते मला खटकल्याचे मोरे यांनी सांगितले.
तर, आमच्या भागात कोणत्याही प्रकारची आरती झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अजानचा आवाज बंद केला. सकाळची अजान अंतर्गत होते.
मी केलेल्या आवाहनाला त्यांनी साथ दिल्याचेही,” ते म्हणाले.

 

 

Web Title :- Vasant More | i am calm now not upset the reaction of former mns corporator vasant more pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा