Vasant More-Manoj Jarange Patil | लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याच्या मनोज जरांगेंच्या भुमिकेमुळे फायरब्रँड नगरसेवक ‘वसंत मोरे’ यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vasant More-Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी लोकसभेत कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत कुणालाही पाठींबा नाही ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, असं देखील जरांगेंनी स्पष्ट केले. जरांगे पाटील यांच्या या भुमिकेमुळे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेले मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. (Pune Lok Sabha Election 2024)

मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस इच्छुक असलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मराठा मोर्चा आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्यावर अपक्ष निवडणुक लढण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. काही दिवसांपुर्वी पुण्यात झालेल्या सकल मराठा मोर्चाच्या बैठकीला उपस्थित राहात त्यांनी मराठा समाजाने पाठींबा देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच काल वंचितचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचीही भेट घेत जरांगे पाटील आणि वंचितच्या पाठींब्यावर अपक्ष लढण्याची इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान, आज अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या अहवालाचा अभ्यास झाला. विशेष असे की, वसंत मोरे हे कार्यकर्त्यांसोबतच आज अंतरावली सराटी येथे गेले होते. दरम्यान, संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ३६ मतदार संघांचा दिलेला अहवाल पाहील्यानंतर मनोज जरांगे यांनी कुठेही अपक्ष उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले. कुठेही प्रचाराला जाणार नाही, लोकांचं उलट आहे आपलं उलट आहे. लोक मतं मागायला जातात पण आपल्याडे आधी मतं आहेत. मराठ्यांची परिस्थिती आता पहिल्यासारखी राहिली नाही. कोणताही उमेदवारी देणार नाही, पाठिंबा देणार नाही. आता मराठा समाजाने निर्णय घ्यावा, असे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाने निवडणुकीत पडण्याची गरज नाही. गावागावातून आलेल्या अहवालातून अपक्ष उमेदवार देता येणार नाही. मात्र तुम्हाला ज्यांना पाडायचं आहे त्यांना पाडा, असे आवाहन जरांगे यांनी केले. मनोज जरांगे म्हणाले, मी खूप साधारण माणूस आहे. मला राजकारण कळत नाही. मी राजकारणात असलो काय नसलो काय माझ्यात आरक्षण मिळवून देण्याचा दम आहे. लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार नाही. जो सगेसोयरे कायद्याला विरोध करेल त्याला पाडा.

मनोज जरांगे पाटील यांच्या या भुमिकेमुळे वसंत मोरे यांचा पुरता हिरमोड झाला. मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), संजय राउत (Sanjay Raut) आणि कॉंग्रेसच्या नेत्यांचीही भेट घेतली होती. यानंतर त्यांनी मराठा मोर्चा आणि वंचितकडेही (Vanchit Bahujan Aghadi) मोर्चा वळविला. परंतू मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेमुळे येथेही मोरे यांच्या पदरी निराशा पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leopard Near Pune Hinjewadi IT Park | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात आढळला बिबट्याचा नवजात बछडा, वनविभागाने ताब्यात घेऊन त्याला… (Video)

Pune Hadapsar News | ‘राईड टू सेफ्टी’ प्रकल्पांतर्गत पोलीस व त्यांच्या पाल्यांना हेल्मेटचे वाटप