Vasant More On Jitendra Awhad | वसंत मोरेंनी जितेंद्र आव्हाडांना रोखठोख सुनावले; मी मुरलीची ‘मुरली’ वाजवतो की आव्हाडांची ‘पुंगी’ हे भविष्यात कळेल (Video)

पुणे : Vasant More On Jitendra Awhad | एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता इतक्या खालच्या पातळीवर बोलतो. मी मुरलीची ‘मुरली’ वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल. जितेंद्र आव्हाडांनी जो गरिबांवर अन्याय केलाय, फेसबुकवर लिहिलेल्या एकाला घरात बोलावून मारले, अशा नेत्याला सर्वसामान्यांचे दु:ख काय कळणार. वसंत मोरेंचे तुम्हाला आव्हान आहे, मी केलेले काम पाहायला पुण्यात या, असा घणाघात वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. यावर वसंत मोरे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आव्हाडांना रोखठोख सुनावले.

वसंत मोरे म्हणाले, जितेंद्र आव्हाड हे मोठे कलाकार आहेत. वसंत मोरे हा कलाकार नाही. त्यांना वसंत मोरे समजला नाही. समजायचे असेल तर त्यांना पुण्यात यावे लागेल. पुण्यात वसंत मोरेंचे काम पाहावे लागेल. त्यानंतर वसंत मोरे कलाकार आहे की कार्यकर्ता हे समजेल.

वसंत मोरे म्हणाले, चेहऱ्यावरून नव्हे तर वसंत मोरेंच्या कामावरून प्रकाश आंबेडकर मला ओळखतात. ही माझी पावती आहे. जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचं काम बघायची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवक होतो, तिथे १५ वर्षात मी केलेले काम पाहायचे असेल तर जितेंद्र आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेचं काम काय, किती लोकांसाठी काम करतो हे कळेल, असे मोरे यांनी सुनावले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते…
जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना म्हटले होते की,
प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंमध्ये असे संविधानातले कोणते गुण पाहिले? संविधानासाठी लढताना त्यांना कुणी पाहिले नाही.

कुठल्या दलितांच्या मदतीला ते गेले नाहीत. वंचितचे हे गणित कळत नाही. वसंत मोरे हे काय कलाकार आहेत,
त्यांची कलाकारी काय हे मला समजलेले नाही.
पुण्यात रविंद्र धंगेकरांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी वंचितने मोरे यांना उमेदवारी दिली नाही ना? असे आव्हाड यांनी म्हटले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिलाषा मित्तलने उचललं टोकाचं पाऊल, हत्या कि आत्महत्या?

Mahavitran’s EV Charging Station In Pune | महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर ! पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

Pune Mahavitaran News | महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड; चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित