Vasant More On Pune Hit And Run Case | पुणे हिट अँड रन प्रकरण : पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते…, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vasant More On Pune Hit And Run Case | कल्याणी नगर अपघात प्रकरणावरुन (Kalyani Nagar Accident) राज्यातील राजकीय राजकारण तापले आहे. त्यातच पुण्यातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि महायुतीचे (Mahayuti BJP Candidate) नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी यामध्ये उडी घेतली आहे. कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता…, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. (Pubs In Koregaon Park Pune)

अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला काही अटींच्या आधारे काही तासात मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केला आणि पुन्हा एकदा त्याला न्यायालयात हजर केले. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अपघातावेळी अल्पवयीन मुलगा दारू प्यायला होता, हे न्यायालयाला पटवून देण्यात पुणे पोलिस यश आले. यानंतर न्यायालयाने जुना निर्णय बदलून, अल्पवयीन मुलाला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले. यानंतर आता वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. (Porsche Car Accident Pune)

वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमके काय म्हटलेय?

कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता…, पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते…, नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे,

तसेच ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे,
नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि
वरील भागांमध्ये नाईट लाईफ साठी जाणारी तरुण पिढी नारळाचे पाणी पिण्यासाठी जाते का ?
कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफ मध्ये लागेबांधे आहेत भविष्यात
जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील…
पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे…
अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली
तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल…, असे वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त