Vastu Tips : घरात अशांती आणते नटराजची मूर्ती ! जाणून घ्या घरात कोणत्या देवाची प्रतिमा ठेवू नये

पोलीसनामा ऑनलाइन – हिंदू धर्मात पूजापाठाला विशेष महत्व आहे. बहुतांश लोक देवी – देवतांच्या मूर्तींची पूजा करतात. वास्तुनुसार अनेक मूर्ती किंवा देवाच्या प्रतिमा अशा आहेत ज्या घरात ठेवल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. घरात बनवलेल्या पूजेच्या ठिकाणी वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मूर्ती ठेवल्या जातात. लोक आपल्या दिवसाची सुरूवात पूजापाठ करून करतात. चुकीच्या पद्धतीने मूर्त्यांची पूजा केल्याने गृहकलहाची समस्या होऊ शकते.

वास्तुनुसार, घराच्या ईशान्य कोपर्‍यात (पूर्व-उत्तर दिशा) पूजास्थळ शुभ असते. याशिवाय भंगलेल्या, तुटलेल्या म्हणजे खंडीत मूर्ती ठेवल्याने सुद्धा वास्तू दोष होतो. जाणून घेवूयात पूजास्थळी कोणत्या मूर्ती ठेवणे वर्ज्य असते…

नटराज
नटराज हे भगवान शंकराचे रौद्र रूप आहे. जेव्हा भगवान शंकरांना जास्त राग येतो तेव्हा ते नटराजचे रूप धारण करतात. जर तुम्ही शंकराचे नटराज रूप घरात स्थापन केले तर घरात अशांतता पसरू शकते.

काळभैरव
काळभैरव हे सुद्धा भगवान शंकराचेच रूप आहे. परंतु, काळभैरव तंत्र-मंत्र विद्येची देवता मानली जाते. काळभैरवाची उपासना घराच्या आत करून नये.

राहु-केतु
ज्योतिषशास्त्रात राहु-केतुला पापग्रह किंवा छायाग्रह म्हटले जाते. जन्मकुंडलीत राहु-केतु संबंधी दोष शांत करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. परंतु, वास्तुशास्त्रानुसार त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवणे वर्ज्य आहे.

शनिदेव
शनि महाराज सूर्यपुत्र आहेत. त्यांच्या पूजेचे अनेक नियम आहेत. सूर्यास्त झाल्यानंतर त्यांची पूजा केली जाते. शनि महाराजांची पूजा नेहमी घराच्या बाहेर केली जाते, यासाठी चुकूनही शनिदेवाची मूर्ती आपल्या घरात स्थापन करू नका.