काँग्रेसनं आम्हाला खेळवलं, आता आघाडी नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच सत्ताधारी शिवसेना आणि भाजपने देखील आपली जागावाटप अंतिम टप्प्यात आणली आहे. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोबतच्या युतीवर मोठे भाष्य केले आहे.

काँग्रेससोबत युती व्हावी म्हणून आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र त्यांनी आम्हाला खेळवून ठेवले. यामुळे आता या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी होणार नसल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आम्ही अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांना यासाठी प्रस्ताव दिला, मात्र आम्हाला त्यांच्याकडून कोणतंही उत्तर न आल्याने आम्ही अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे आता वंचित किती उमेदवार देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यादी जाहीर करणार –

उमेदवारांच्या घोषणेविषयी बोलताना ते म्हणाले कि, आम्ही आमची वाट नक्की केली असून गणपती विसर्जनानंतर आम्ही आमची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहोत.

काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी नक्की –

युतीची घोषणा झालेली नसताना आघाडीने मात्र जागावाटपात आघाडी घेतली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रत्येकी 138 जागा लढवणार असून मित्रपक्षांना ते 12 जागा सोडणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. त्यामुळे लवकरच आघाडीच्या प्रचाराचा देखील नारळ फुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –