Vedika Shinde | 16 कोटींचे इंजेक्शन दिलेल्या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या वेदिका शिंदेचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vedika Shinde |दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या भोसरीतील (Bhosari) चिमुकल्या वेदिका सौरव शिंदे (Vedika Sourav Shinde) यांचा आज पहाटे दुदैवी मृत्यु (Death) झाला. तिला लोकवर्गणीतून तब्बल १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन (Injection) दिले होते. त्यानंतर ती बरी होऊन घरी आली होती. मात्र, रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात (Private Hospital) नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यु झाला. १६ कोटी रुपये जमविण्यासाठी तिच्या आईवडिलांनी जीवाचे रान केले होते. त्याला काही दिवसांपुरतेच यश आले.

वेदिका शिंदे (Vedika Shinde) हिला एसएसए१ (SSA 1) हा जेनेटिक आनुवांशिक आजार (Genetic Genetic Disease) होता. दहा हजारांमध्ये तो एखाद्या मुलाला होतो. पुढे न्युमोनिया (Pneumonia) होऊन मूल दगावू शकते. काही महिन्यांपूर्वी वेदिका हिला हा आजार झाल्याचे समजले होते. त्यानंतर वेदिकाचे वडिल सौरव शिंदे, (Sourav Shinde) तिची आई व आजोबांनी तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन अमेरिकेतून मागविण्यात आल. ख़ासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी लोकसभेत आवाज उठवून त्यावरील सीमा शुल्क माफ करण्याची मागणी केली. केंद्र शासनाने (Central Government) आयात कर रद्द केला.

गेल्या महिन्यातच पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये (Private Hospital) तिला हे इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले होते.
त्यानंतर वेदिका पूर्ण बरी होऊन घरी गेली होती.
मात्र, शिंदे कुटुंबियांचा हा आनंद अल्पकाळच टिकला.

Web Title : Vedika Shinde dies after injecting Rs 16 crore

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Latur Crime | जमीनीच्या वादातून उदगीर तालुक्यातील नागलगाव शिवारात गोळीबार

Lisa Haydon च्या मुलांना शाप द्यायला निघाला होता यूजर, अभिनेत्रीच्या एका शब्दाने केली बोलती बंद

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,479 नवीन रुग्ण, तर 4,110 जणांना डिस्चार्ज

PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Shirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

Triple Murder in Sangli | तिहेरी खुनामुळे सांगलीत प्रचंड खळबळ ! मोहिते-साठे गटात तुफान ‘राडा’