Veerappan Documentary | कुख्यात स्मगलर वीरप्पनच्या आयुष्यावर आधारित नेटफ्लिक्सने बनवली

पोलीसनामा ऑनलाइन – Veerappan Documentary | आत्तापर्यंत अनेक खलनायकांच्या, हिरोंच्या सिरीज, डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स तर्फे बनवण्यात आल्या आहेत. पण नेटफ्लिक्स (Netflix Series) कडून भारतातील सर्वांत कुप्रसिद्ध व खतरनाक डाकूच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री (Netflix Documentary) बनवण्यात येणार आहे. भारतामध्ये 80 व 90 चे दशक ज्या डाकूने अक्षरशः गाजवले त्या डाकू वीरप्पन (Veerappan) चा जीवनपट बनवण्यात (Veerappan Documentary) येणार आहे. या डाकूने पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. आता नेटफ्लिक्स वर या भारतातील कुख्यात डाकू वीरप्पन याच्यावर आधारित डॉक्युमेंट्रीचा टीझर (Veerappan Documentary Teaser Out) रिलीज करण्यात आला आहे. टीझरवरुनच या डाकूबद्दलची दहशद व त्याचा दरारा किती होता याची प्रचिती येत आहे. ‘द हंट फॉर वीरप्पन’ (The Hunt for Veerappan) याच्या टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

तमिळनाडू (Tamil Nadu) व कर्नाटक (Karnataka) या राज्यांमधील जंगलामध्ये गुंड वीरप्पन याने त्याची दहशत निर्माण केली होती. तो जंगलामध्ये जबरदस्त चंदनाच्या झाडांची तोड व चंदनाची तस्करी (Sandalwood Smuggling) करायचा. त्यानंतर त्याने हस्तिदंत मिळवण्यासाठी हत्तींची कत्तल करण्यास सुरुवात केली. जंगलातील हत्तींच्या हस्तीदंताची तो तस्करी (Ivory smuggling) करत असे. असे म्हणतात की वीरपन्नने हस्तदंत मिळवण्यासाठी तब्बल दोन हजार हत्तींची कत्तल केली होती. त्याने त्याची दहशत अशी निर्माण केली होती की संपूर्ण देशभर त्याची चर्चा चालू होती. जवळजवळ 30 वर्षे त्याने कर्नाटक, केरळ व तमिळनाडू राज्यामध्ये त्याची तस्करी (Smuggler Veerappan) चालू ठेवली होती. या गुंड वीरप्पन याच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्री नेटफ्लिक्स घेऊन येत आहे.

तस्करी करणाऱ्या या डाकू वीरप्पन याचा अंत 2004 साली एका स्पेशल ऑपरेशन मध्ये (Veerappan Death)
करण्यात आला. त्याच्या जन्मापासून ते त्य़ाचे तस्करीमध्ये येण्याचे कारण, त्यांची पूर्ण दहशद निर्माण करणारे जीवन
व त्याचा करण्यात आलेला अंत या सगळ्या वीरप्पनच्या आयुष्यातील पैलूवर आधारित डॉक्युमेंट्री
(Veerappan Documentary) बनवण्यात आली आहे. ही ‘द हंट फॉर वीरप्पन’ डॉक्युमेंट्री येत्या 4 ऑगस्टला
प्रेक्षकांच्या (Veerappan Documentary Release Date) भेटीस नेटफ्लिक्सवर येणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Alia Bhatt | आलियाच्या बॅगमध्ये तिच्या पेक्षा राहाचे सामान असते जास्त; “माझी बॅग आता माझी राहिली नाही”

Samantha Ruth Prabhu | सामंथाने अवघ्या 4 डिग्रीमध्ये घेतला थंडगार आइस बाथ; व्हिडिओ व्हायरल