नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचं दिसत आहे. लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’ च्या एका पत्रकाराने नीरव मोदीशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला काही प्रश्न विचारले आहे परंतु प्रत्येक प्रश्नाला नीरव मोदी नो कमेंट्स असे उत्तर देत होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान या व्हिडीओनंतर आता नीरव मोदीला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग आल्याचे दिसत आहे.

दरम्यान नीरव मोदीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न सुरु आहेत. ते कॅमेऱ्यात दिसले म्हणून लगेचच त्यांना भारतात आणू शकतोत असे होत नाही. असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हंटले होते. परंतु आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा म्हणून ओळखल्या जाणारा, पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटींचा घोटाळा करुन फरार झालेला हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदी लंडनमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाची चर्चा सुरु झाली आहे.

कॅमेऱ्या मध्ये दिसल्या प्रमाणे, नीरव मोदीने एक जॅकेट घातलेले दिसत आहे. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा हजार पाऊंड म्हणजेत नऊ लाख रुपये असल्याची चर्चा आहे. जवळपास दोन मिनिटांच्या व्हिडीओत पत्रकार वारंवार नीरव मोदीला प्रश्न विचारत त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांसंबंधी विचारणा करत आहे. मात्र नीरव मोदी कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. दरवेळी नीरव मोदी ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतिक्रिया देतांना दिसत आहेत.

ह्याहि बातम्या वाचा

भाजपला धक्का : मोदींचा कट्टर विरोधक काँग्रेस सोडणार नाही

पत्रकार निरव मोदीला शोधू शकतात तर सरकार का नाही ?

”पुन्हा भाजपची सत्ता येईल, पण पंतप्रधान मोदीच होतील का शंकाच”

‘टेलीग्राफचे पत्रकार नीरव मोदीला शोधू शकतात , परंतु चौकीदार नाही’…!