‘कोरोना’मुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना संसर्गामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय 79) यांचे आज पहाटे चार वाजता निधन झाले. सातार्‍यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोविड अतिदक्षता विभागात पाच दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. परंतु अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणारे अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदय विकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली.

आशालता यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटात गेल्या काही दशकांमध्ये त्यांनी अभिनयातून लोकांना आपलेसे केले होते. दरम्यान, जिल्ह्यात काळूबाई मालिकेचे चित्रिकरण सुरु होते. चित्रिकरणादरम्यान मुंबईतील काही कलाकार एक दिवस सहभागी झाले होते. त्यावेळी मालिकेतील काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचाही समावेश होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने येथील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले होते. आशालता यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like