Vi नं भारतामध्ये लॉन्च केले 5 नवीन प्लॅन, जाणून घ्या ग्राहकांना बक्षीस स्वरूपात काय मिळणार

पोलिसनामा ऑनलाईन – व्होडाफोन आयडिया आता एकत्र होऊन व्हीआय झाले आहे. कंपनीने आता भारतीय बाजारात नवीन प्रीपेड योजना आणल्या आहेत. या योजनांची किंमत ३५५ रुपयांपासून ते २,५९५ रुपये पर्यंत आहे. या योजनांमध्ये ग्राहकांना कॉलिंग-डेटासह ओटीटी अ‍ॅपचाही लाभ मिळेल.

व्हीआयच्या ३५५ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना ५० जीबी डेटा आणि २८ दिवसांची वैधता मिळेल. या योजनेत ग्राहकांना कॉलिंगची सुविधा मिळणार नाही.

यानंतर ४०५ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना दररोज ९० जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जात आहेत. या योजनेची वैधताही २८ दिवसांची आहे. तसेच या योजनेत ग्राहकांना एमपीएलमध्ये गेम्स खेळण्यासाठी १२५ रुपयांचा अशुर्ड कॅश बोनस आणि झोमॅटोवर दररोज ७५ रुपयांची सवलतही मिळेल.

त्याचप्रमाणे ५९५ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित मोफत कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतील. तसेच ग्राहक झोमॅटो आणि एमपीएल ऑफरचा लाभही घेऊ शकतील. या योजनेची वैधता ५६ दिवस आहे.

यानंतर ७९५ रुपयांच्या योजनेत ग्राहकांना अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दररोज मिळतील. तसेच या योजनेत ग्राहकांना झोमॅटो आणि एमपीएल ऑफरचा लाभही मिळेल. या योजनेची वैधता ८४ दिवसांची आहे.

२,५९५ रुपयांची योजना एक दीर्घकालीन योजना आहे. त्याची वैधता ३६५ दिवस आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि १०० एसएमएसचा लाभ मिळेल. तसेच एमपीएल आणि झोमॅटो ऑफरचा लाभही घेऊ शकतील. वर नमूद केलेल्या सर्व योजनांमध्ये झी5 चे प्रीमियम सबस्क्रिप्शनही एका वर्षासाठी दिले जाईल.