मलाइका-अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाज खानने दिले मिडियाला ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन यांचे प्रेम चांगलेच दिसत आहे. दोघेही नेहमी अनेक पार्टीमध्ये दिसून येतात. काही दिवसांपुर्वी या दोघांच्या लग्नाविषयी चर्चा प्रचंड व्हायरल झाली होती. त्यावेळी दोघांनी लग्नाबाबत त्यांचे मत स्पष्ट सांगितले होते. त्यांच्या लग्नाला अजून खूप वेळ आहे. याच दरम्यान मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल अरबाजने एका पत्रकार परिषदेत मिडियाला सडेतोड उत्तर दिले आहे.

पत्रकार परिषदेत अभिनेता अरबाजला मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याबद्दल विचारले गेले. अरबाजने सांगितले की, का कुणाच ठाऊक की, लोक मलाइका और अर्जुन यांच्या नात्याबद्दल काय काय बोलत असतात. लोकांना कुठून कळते की हे दोघे रोमॅन्स करत आहे, लग्न करणार आहे. लग्नाबाबत मलायका आणि अर्जुनने देखील कन्फर्म सांगितले नाही व त्यांच्या परिवाराने देखील असे काही सांगितले नाही. यादोघांबद्दल माहिती मिडियाला कुठून कळते माहित नाही.

पुढे अरबाज म्हणाला की, दोघे एकत्र दिसतात याचा अर्थ असा नाही की, दोघे रोमॅन्स करत आहे. जे लोकांच्या मनात येते ते बोलत राहतात. पण मला या गोष्टींचा काही फरक पडत नाही. मी माझे जीवन चांगलप्रकारे जगत आहे. जेव्हा मी लग्नाचा विचार करेल तेव्हा मी सांगेन.

View this post on Instagram

#lookingahead

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial) on

अरबाज सध्या ‘दबंग 3’चित्रपटाच्या डायरेक्शनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत आहे. सध्या अर्जुनकडे कोणताच मोठा चित्रपट नाही. मलायका आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. ती नेहमी जीमला जाताना स्पॉट होते.

 

You might also like