कुमारस्वामी सरकार पाडण्यात भाजपचा ‘क्रिम’रोल असल्याचं येडियुरप्पांनी स्विकारलं, व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेस SC मध्ये जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडू शकते. या कथित व्हिडिओमध्ये येडियुरप्पा स्वीकारत आहे की कर्नाटकमधील मागील कुमारस्वामी सरकार पाडण्यात ‘ऑपरेशन कमळ’ची महत्वाची भूमिका होती. यानंतर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वात जुलैमध्ये भाजप सरकार सत्तेत आले होते.

7 मिनिटाचा हा व्हिडिओ हुबळीमधील पार्टी मिटिंगमधील आहे असे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की यात येडियुरप्पा यांचा आवाज आहे. परंतू ते या व्हिडिओमध्ये दिसत नाहीत फक्त आवाज ऐकू येत आहे.

येडियुरप्पा यांनी मागील महिन्यात 26 ऑक्टोबरला हुबळीच्या हॉटेल डेनिसन्समध्ये पक्ष नेत्यांची बैठक घेतली. यात 5 डिसेंबरला 15 विधानसभेच्या जागांसाठी पोट निवडणूकासंबंधित चर्चा झाली. ही व्हिडिओ त्याच दिवसाचा असल्याचे सांगण्यात येत आहेत. यात येडियुरप्पा यांनी कथित स्वरुपात पक्षाच्या त्या सदस्यांबद्दल नाराजी व्यक्त केली ज्यांनी पक्ष सोडला.

या व्हिडिओमध्ये येडियुरप्पा यांनी सांगितले की, तुम्ही सर्वजण 17 आमदारांच्या निर्णयाबद्दल जाणून असाल, तुम्हाला माहिती असेल की त्या सर्वांना मुंबईला पाठवण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता तर पक्षाचा होता. अडीच महिने न की ते आपल्या मतदारसंघात जाऊ शकले ना की कुटूंबाला भेटू शकले, ते सर्व मुंबईमध्ये होते.

या व्हिडिओनंतर काँग्रेसने आरोप लावला आहे की भाजपने कुमारस्वामींचे सरकार पाडले. आता काँग्रेसने सांगितले की हा व्हिडिओ पुरावा म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या