#Video : कोवळ्या वयातच तैमूर अली खानने काढला हातावर Tattoo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार किड तैमूर अली खान आपल्या क्युटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तैमूर शाहरुखचा छोटा मुलगा अबरामच्या बर्थडे पार्टीत दिसला होता. या बर्थ डे पार्टीत तो त्याचे पप्पा सैफ अली खान आणि मम्मी करीना कपूर सोबत आला होता. या पार्टीत तैमूर भरपूर एन्जॉय केलं. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, तैमूरने आपल्या हातावर कलरवाला टेंपररी टॅटू काढला आहे.

सध्या तैमूरचा टॅटू काढतानाचा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, तैमूरने पिकं कलरचा शर्ट आणि डेनिम घातली जिन्स घातली आहे. तो नेहमीप्रमाणे क्युट दिसत आहे. असे समजत आहे की, तैमूरला टॅटूचा चांगलाच शौक आहे.

याआधीही तैमूरच्या हातावर टॅटू दिसला आहे. तो एका मित्राच्या पार्टीत हातावर टॅटू काढून आल्याचे दिसून आले. तैमूरने आपल्या हातावर माशाचा टॅटू काढला होता. तुम्हाला सांगू इच्छितो की, तैमूर सध्या लंडनमध्ये आहे. गुरुवारी रात्री त्याला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले होते.

शाहरुखचा मुलगा अबरामच्या बर्थडे पार्टीबद्दल सांगायचे झाले तर, या पार्टीची थीम अॅव्हेंजर्सची होती. या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्टीचे आयोजन फाईव्ह स्टार हॉटेल Taj Land’s End Mumbai मध्ये करण्यात आले होते.