नोरा फतेहीच्या ‘त्या’ बेली डान्स चा व्हिडिओ व्हायरल ; ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये आपल्या धमाकेदार डान्सचा जलवा दाखविणारी अभिनेत्री नोरा फतेही तिची चर्चा जोरदार सुरु आहे. नोरा फतेहीच्या बेली डान्सचा व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तिने ‘स्त्री’ मध्ये ‘कमरिया’ डान्सवर जबरदस्त डान्स केला आहे. नोरा फतेहीचा या डान्सचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुप जुना आहे तरी देखील या व्हिडिओला ४ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

या व्हिडिओमध्ये नोरा बेली डान्स करताना दिसत आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने या व्हिडिओमध्ये अरेबियन डान्स केला आहे. ती एका वाळवंटात डान्स करताना दिसत आहे. फक्त २ मिनिटाच्या या व्हिडिओने चाहत्यांना वेडे केले आहे.

https://youtu.be/rgtEuBMDbAI

या म्यूझिकवर नोरा एकदम परफेक्ट डान्स करत आहे. नोरा बॉलिवूडमध्ये खुपच चर्चेत आहे. ती सोशल मिडियावर खुपच अॅक्टिव्ह असते. नोराने ‘सत्यमेव जयते’ च्या ‘दिलबर’ खूपच सुंदर डान्स केला आहे. नोरा फतेही हार्डी संधू पंजाबी गाणे ‘नाह’ यावरही डान्स केला आहे. तिने बॉलिवूडमध्ये ‘रोरः टाइगर्स ऑफ द सुंदरबंस’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.