काय सांगता ! होय, चक्क ‘तिरंगा’ फडकवण्यावरून काँग्रेस नेत्यांमध्ये ‘तुंबळ’ हाणामारी (व्हिडीओ)

इंदौर : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत प्रजासत्ताक दिन देशामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, मध्यप्रदेशामध्ये या उत्साहाला गालबोट लागले.

मध्यप्रदेशात बऱ्याच वर्षांनंतर भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली. यामुळे येथील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, प्रजासत्ताक दिनी कोणी झेंडा फडकवायचा यावरून मानापमान नाट्यही घडले. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त इंदौरच्या काँग्रेस कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस भवनामध्ये झेंडावंदनाला सर्व काँग्रेस नते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, झेंडा कोणी फडकवायचा यावरून दोन गटात वाद झाले.

मानापमान नाट्यामुळे काँग्रेस नते देवेंद्रसिंह यादव आणि चंदू कुंजीर यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. अखेर यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोघांना समजावून सांगत सुरु असलेली मारामारी सोडवली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील गटबाजी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारावरून पुण्यात एका गटाने काँग्रेस भवनाची तोडफोड केली होती. यानंतर त्या आमदाराने तोडफोड करणारे कार्यकर्ते आपले नसल्याचे सांगत हात झटकले होते.

फेसबुक पेज लाईक करा –