विधानपरिषद निवडणूक बिनविरोध, भाजपच्या पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन

विधानपरिषदेच्या निवडणूकीत घोडेबाजार रोखण्यासाठी सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज भरल्याने निवडणूक होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे विधानपिरषदेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4fad1c14-8374-11e8-b25d-13b5e72140fa’]

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याची सर्वच पक्षांनी तयारी दाखवली होती. पंरतु देशमुख यांच्या अर्जामुळे निवडणूक होण्याची चिन्ह निर्माण झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्ज मागे घेतला असल्याची चर्चा असली तरी, देशमुख यांच्या अर्ज मागे घेण्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याचे मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले.

महादेव जानकर यांनी रासपकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने भाजपने ऐनवेळी पृथ्वीराज देशमुख यांना मैदानात उतरवले होते. त्यामुळे विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बारा अर्ज दाखल झाले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या सर्व शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57f4dcc5-8374-11e8-bca7-db79062c7ed2′]

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी पाचनंतर मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक, शिवसेनेचे दोन, रासप एक, शेकाप एक आणि भाजपचे चार उमेदवार रिंगणात आहेत.

पक्षनिहाय उमेदवार

भाजप  – भाई गिरकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, नीलय नाईक (वसंतराव नाईक यांचे नातू), राम पाटील रातोळीकर
रासप – महादेव जानकर
काँग्रेस – शरद रणपिसे, डॉ. वजाहत मिर्झा
शिवसेना – अनिल परब, मनिषा कायंदे
राष्ट्रवादी काँग्रेस – बाबाजानी दुर्राणी
शेकाप – जयंत पाटील