माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप !

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या कन्येने आई-भावांवर आरोप केल्यानंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या पत्नी मंदाकिनी शिवतारे (Mandakini Shivatare) यांनी हा आरोप खोडून काढत फेसबूक लाईव्हद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. मागील 27 वर्षांपासून माझे पती विजय शिवतारे (Vijay Shivtare) कुटुंबापासून अलिप्त असून पहिली 5 वर्ष एका महिलेसोबत लग्न करुन राहत होते. त्यानंतर आजपर्यत दुसऱ्या महिलेसोबत पवईला राहत आहेत, असा दावा शिवतारे यांच्या पत्नी मंदाकिनी यांनी केला आहे. तर, विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते सध्या आयसीयूमध्ये (ICU) आहेत. vijay shivatare wife facebook live and mamta shivtare post

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

विजय शिवतारेंच्या पत्नीने केलेला दावा –
विजय शिवतारेंच्या (Vijay Shivtare) पत्नी मंदाकिनी शिवतारे (Mandakini Shivatare) यांनी मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊण्टवरुन लाईव्ह येत लेकीचे आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझी मुलगी ममता शिवदीप लांडे- शिवतारे (Mamta Lande- Shivtare) यांनी केलेली पोस्ट वाचली. तिने माझा मुलगा विनय आणि विनस यांच्याविरोधात केलेले आरोप खोटे आहेत. वास्तविक मागील 27 वर्षापासून माझे पती विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे कुंटुबियांपासून अलिप्त राहत आहेत. त्यातील पहिली 5 वर्ष ते उज्ज्वला बागवे हिच्यासोबत लग्न करुन राहत होते. त्यांच्यानंतर आजपर्यत ते मिनाश्री पटेल हिच्यासोबत पवई येथे राहतात. याबाबतीत संपत्ती या वादाचा विषय नसून विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्याव्दारे सुरु असलेली मानसिक छळवणूक थांबविणे व स्वतःला त्या जाचातून मुक्तता करुन घेणे हा एकमेव हेतू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांची कन्या ममता लांडे- शिवतारे (Mamta Lande- Shivtare) या आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत. ममता यांनी आज सकाळीच एक केलेली पोस्ट व्हायरल होत आहेत.

Pune Crime News। पुण्यात सिनेस्टाईल थरार सीसीटीव्हीत कैद; महिला पीएसआयने कारच्या दिशेने पिस्तुल रोखलं अन्…

ममता लांडे- शिवतारे यांचे आरोप –
ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU विभागात बसून हे लिहिण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. ‘मी ममता शिवदीप लांडे-शिवतारे, आजवर आपण बापूंच्या राजकीय कारकीर्दीत क्वचितच मला पाहिले असेल. मग आज मी बोलत आहे तर नक्कीच त्यामागे एक मोठ्ठ कारण आहे. बापूंसारखे वडील मला मिळाले हे माझे भाग्य. मला त्यांनी फुलासारख जपलं. माझी प्रत्येक जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली. मला अपार प्रेम दिल. माझ्या आयुष्यात त्यांना देवापेक्षाही वरच स्थान आहे. अश्या माझ्या पित्याची माझ्याच भावांनी संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून आज मी अत्यंत अवस्थ आहे. असं त्यांनी पोस्ट केलं आहे.

पुढे लिहलं आहे की, ‘मागील काही दिवसात फेसबुक वरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. ‘माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. परंतु, कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं आणि आजही वाटतं.असे त्या म्हणाल्या.

माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही माझ्या आजारी वडिलांना भेटायला आलं नाही..
‘मागील वर्षी जानेवारी 2020 मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहीतच आहे.
डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता 20 टक्के असे म्हटले.
माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती.
ऑपरेशन यशस्वी झालं, पण त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता.
गेल्या दीड वर्षापासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात.
या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही.
ते आहेत की नाही ? हे देखील विचारपूस केली नाही.
त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून, त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सूरु झाले. असं ममता म्हणाल्या.

‘आजवर आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली.
तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे. या सर्व गोष्टीत मी कायम केवळ बघ्याची भूमिका बजावत होती.
मी स्वतः डॉक्टर असल्याने त्यांच्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेत मी जानेवारी 2021 मध्ये हॉस्पिटलचा राजीनामा दिला व पूर्ण वेळ बाबांसोबत राहून त्यांच्या कामाचा ताण कमी करण्याचा व आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळाले आणि विनयच्या धमक्यांकडे त्यांनी लक्ष दिलं नाही.
परंतु, मागील दोन महिन्यांपासून तो दबाव सोशल मीडियाद्वारे बदनामी करून सतत वाढवला जात आहे.
सर्व संपत्ती नावावर करूनही मानसिक त्रास कमी होत नव्हता.
तो आताही अश्याच बदनामीच्या धमक्या देत आहे. असं त्यात लिहिलं आहे.

पुढे त्यामध्ये म्हटलं आहे की, ‘आपण माझ्या बाबांवर अफाट प्रेम केलंत.
तेच त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते प्रेम कधीही कमी पडू देऊ नका.
आणि बाबाही अविरत पुरंदर साठी आपला जीव ओततील.
आज सर्व काही सहनशीलतेच्या पलीकडे गेलं आहे आणि त्याच धक्क्याने त्यांना पहाटे हृदयविकाराचा Heart disease झटका आला.
ICU मध्ये रात्री 2 वाजता मी त्यांना घेऊन आली, ऍडमिट केले.
माझी देवाला प्रार्थना आहे, मला बळ दे.!!!’ अशी प्रार्थना ममता लांडे- शिवतारे (Mamta Lande- Shivtare) यांनी केलीय.

ममता यांनी मांडलेले प्रश्न –
1994 साली घडलेल्या घटना सत्य असोत वा असत्य, आज 27 वर्षानंतर त्या का आठवाव्यात?
बाबांचा इतका द्वेष वाटत असेल तर त्यांचा राजकीय व आर्थिक व्यवहार विनय शिवतारेने 2018 पर्यंत का सांभाळला?
बाबांनी कमावलेली संपत्ती आजवर दोघांनी निमूटपणे नावे का करून घेतली?
विनय शिवतारे व विनस शिवतारे यांनी स्वकर्त्वृत्वावर आजवर काय कमावल?
वाद सर्व घरात असतात, म्हणतात ना घरोघरी मातीच्या चुली…पण मृत्यूशय्येवर असलेल्या वडीलांसोबत असा व्यवहार कीतीही वाईट असले तरी कोणी मुलगा करणे योग्य आहे का ?

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : vijay shivatare wife facebook live and mamta shivtare post

हे देखील वाचा

Pune News | पुरंदर किल्ल्यावर उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प; पुणे महापलिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता