Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचे वादग्रस्त वक्तव्य, ‘मंदिरातील दानपेट्या काढल्या तर पुजारी…’

परभणी : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी परभणी येथील एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या (Gagan Malik Foundation) वतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहाफुटी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, देशभर जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवले जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दान पेट्या काढून घेतल्यास, मंदिरात असलेले पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेख ही करणार नाहीत.

या सोहळ्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), थायलंड येथील भिक्खू गगन मलिक यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती.

दरम्यान, परभणी दौऱ्यावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ओबीसी सभा घेण्यास ब्लॅकमेल करत आहेत का? यावर वडेट्टीवार म्हणाले,
मला याबाबत संशय आहे, पूर्ण खात्री करून मी यावर बोलेन.
मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाची भूमिका मांडत आहेत आणि
आम्ही आमच्या हक्कासाठी आमची भूमिका मांडत आहोत.
कुठेही द्वेष पसरवण्याबाबत आम्ही कुणाचेही समर्थन करत नाहीत. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा.
महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रिक्षाचालकाने रिक्षासह पळून जाताना पोलीस कर्मचाऱ्याला फरफटत नेले

पत्नीबाबत अपशब्द बोलणे भोवले ! नर्‍हेच्या डोंगराजवळ तरुणाचा खून, सराईत गुन्हेगाराला अटक

पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला भोसरी पोलिसांकडून अटक