मुंबई : Vijay Wadettiwar On Sanjay Raut | संजय राऊत २३ जागा लढवणार म्हणत असतील, तर त्यांच्या विधानाचे खंडण कशाला करू. हायकमांड निर्णय घेतील. हायकमांडने ठरवले असेल, तर आमचा अधिकार नाही. त्यामुळे याबाबत अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा लढवणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यावर वडेट्टीवार (Vijay Wadettiwar On Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी म्हटले की, काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्याशी चर्चा केली, हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडले, हे आम्हाला माहिती आहे. (Vijay Wadettiwar On Sanjay Raut)
तसेच राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाबाबत दिल्लीत चर्चा होणार आहे.
आम्ही २३ जागा लढवणार असल्याचे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
प्रकाश आंबेडकर महाविकास आणि इंडिया आघाडीचे (India Alliance) घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली.
दरम्यान, राऊत यांनी २३ जागांबाबत दावा करताना काँग्रेस हायकमांडचे नाव घेतल्याने वडेट्टीवार यांनी वरील सावध प्रतिक्रिया दिली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
किरकोळ कारणावरुन कॉलेज तरुणांमध्ये राडा, तरुणाच्या डोक्यात वार; आण्णासाहेब मगर कॉलेज जवळील घटना