गँगस्टर विकास दुबेची पत्नी म्हणते – ‘तर त्यांना तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास बंदूकही उचलेन’

कानपूर : वृत्तसंस्था – गँगस्टर विकास दुबे याचा यूपी पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याचे कानपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. मेहुणा दिनेश तिवारी, पत्नी रिचा दुबे आणि मुलगाही अंत्यसंस्कारसाठी पोहचले होते. पत्नी रिचाने मीडियावर राग व्यक्त करत सांगितले की, ज्याने हत्या केली आहे, त्यालाही तसाच धडा शिकवेन, गरज भासल्यास मी बंदूकही उचलेन.

विकास दुबे याच्या वडिलांनी सांगितले की, जे घडले ते ठीक झाले. अखेर विकासचा मेहुणा दिनेश तिवारी हा विकासचा मृतदेह घेण्यासाठी पोस्टमार्टमच्या घरी पोहचला. तेथून अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह भैरव घाट येथे नेण्यात आला. याठिकाणी विकास दुबे याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
कानपूर आउटनंतर आठवडाभरापासून फरार असलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याला उज्जैनच्या महाकाल मंदिरात बाहेरून काल अटक करण्यात आली होती.

उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला परत येत होते. पावसामुळं रस्ता काहीसा निसरडा झाला होता. बर्रा येथे असताना पोलिसांची कार अचानक रस्त्यावर उलटली. या अपघातात दुबेसह काही पोलीस जखमी झाले. जखमी अवस्थेतही दुबे पळण्याची संधी शोधत होता. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात विकास दुबेला गोळी लागली आणि तो ठार झाला.

सायंकाळी सहाच्या सुमारास कानपूरच्या हैटल हॉस्पिटलमध्ये अरविंद अवस्थी, शशिकांत मिश्रा आणि विपुल चतुर्वेदी या तीन डॉक्टरांच्या पॅनलने दोन तासांच्या व्हिडिओग्राफी समक्ष पोस्टमार्टम केले. विकासच्या छातीतून तीन गोळ्या तर एक गोळी कंबरेत सापडली आहे.