Vinayak Raut | ‘त्या’ वक्तव्यावरुन अखेर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Raut | काही दिवसापुर्वी शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad News) बोलताना ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यानंतर विनायक राऊत यांनी आज (शुक्रवारी) औरंगाबाद येथे ब्राह्मण समाजाची भेट घेत केलेल्या वक्तव्याची माफी मागितली आहे.

यावेळी बोलताना विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले की, ”काही कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले. त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक आणि माफी मागायला आलो. ब्राह्मण समाजाची माफी मागून त्यांनी कृपा आशीर्वाद कायम ठेवा असे म्हटले आहे. तर काही चूक झाली असेल तर माफ करा,” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद या ठिकाणी 23 मार्च रोजी भाषण करतेवेळी विनायक राऊत यांनी ”आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही”, हे वादग्रस्त विधान केले होते.
त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेत खासदार राऊत यांनी माफी मागावी नाहीतर
त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता.
दरम्यान अखेर राऊत यांनी ब्राह्मण समाजाच्या सदस्यांची भेट घेत माफी मागितली आहे.

 

Web Title :- Vinayak Raut | Shivsena leader and mp vinayak raut finally apologized for that statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

 

Hemant Rasne | सुवर्णयुग सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदी नितीन राऊत

 

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती