First Kiss : ‘रॅपर’ हनी सिंगचं नवं गाणं ‘रिलीज’ ! 24 तासांतच कोट्यवधी Views

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रॅपर आणि सिंगर यो यो हनी सिंग (Yo Yo Honey Singh) याचं नवीन गाणं आज मंगळवारी (दि. 24 नोव्हेंबर 2020) रिलीज झालं आहे. म्युझिक व्हिडिओ टी सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवरून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. फर्स्ट किस (First Kiss : Yo Yo Honey Singh Ft. Ipsitaa) असं या गाण्याचं नाव आहे. पुन्हा एकदा हनी सिंग आपल्या ओळखल्या जाणाऱ्या अंदाजात समोर येताना दिसत आहे. कम्प्लीट रॅपर स्टाईलमध्ये हनी सिंग खूपच कूल दिसत आहे. गाणं रिलीज होताच या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

1 कोटींहूनअ अधिक व्ह्यूज
टी सीरिजनं रिलीज केलेल्या फर्स्ट किस या गाण्याला सोशल मीडियावर मोठी पसंती मिळताना दिसत आहे. 24 तासांपर्वी रिलीज केलेल्या या गाण्याला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. लाखो लोकांनी या गाण्यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. गाण्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.

गाण्याबद्दल बोलायचं झालं तर हे गाणं हनी सिंगनं लिल गोली, होमी दिल्लीवाला, सिंघस्टा सोबत मिळून लिहिलं आहे. यात इप्सिताच्या अदांनीही कहर केला आहे.

हनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं नुकतंच तर छलांग सिनेमातील त्याचं गाणं केअर नी करदा सोशलवर तुफान व्हायरल झालं होतं. यात राजकुमार राव आणि नुसरत भरूचा दिसले होते. आता त्याचं फर्स्ट किस हे गाणं सोशलवर चर्चेत असल्याचं दिसत आहे.

You might also like