Video : सना खाननं ‘अशा’ अंदाजात काढली पतीची नजर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एक्स टीव्ही अ‍ॅक्ट्रेस आणि बिग बॉस स्पर्धक सना खान (Sana Khan) हिनं तिच्या चाहत्यांना इंडस्ट्री सोडत झटका दिला होता, तिनं घोषणा केली होती की, मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी ग्लॅमरची दुनिया सोडत आहे. यानंतर सना खाननं 20 नोव्हेंबर रोजी सुरत, गुजरातमध्ये मुफ्ती अनस (Mufti Anas) नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. सना खान आणि मुफ्ती अनस यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता तिनं सोशल मीडियावर तिचं नाव बदललं आहे. सनानं एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती पतीची नजर काढताना दिसत आहे.

सनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती पतीसोबत दिसत आहे. पतीचा हात हातात घेऊन ती नजर काढताना दिसत आहे. सनाच्या या व्हिडिओची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे.

सध्या सनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सनाचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करत प्रतक्रियादेखील दिल्या आहेत.

सनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2014 मध्ये आलेल्या सलमान खानच्या जय हो सिनेमात तिनं काम केलं आहे. याशिवाय ती बिग बॉस 6 मध्येदेखील दिसली आहे. एक टीव्ही अ‍ॅक्ट्रेस म्हणूनही ती खूप फेमस होती.

You might also like