पाकिस्तानी भडकले ! TikTok व्हिडीओसाठी तरूणीचे जिन्नांच्या मजारीसमोरच ‘ठुमके’ (व्हिडीओ)

कराची : वृत्तसंस्था – TikTok ची भुरळ आजच्या तरुणाईला एवढी पडली आहे की कुठे आणि कधी टीकटॉक व्हिडीओ बनवावा याचेही त्यांना भानही राहत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ आहे पाकिस्तानमधील कराची इथला.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या कराची येथे असलेल्या मजार समोर एका तरुणीनं डान्स करत टिकटॉक व्हिडीओ तयार केला आहे. या तरुणीच्या डान्सचा व्हिडीओ टिक टॉकच नाही तर इतर सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून ही तरुणी जिन्ना यांच्या मजार समोर केवळ टिक टॉक व्हिडीओ तयार करण्यासाठी डान्स करत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तरुणीला टीकेला सामोरं जावं लागलं आहे. या व्हिडीओला विरोध दर्शवणारे ट्विट्सही समोर येत आहेत. तर मजार येथे तैनात करण्यात आलेले सुरक्षारक्षक काय करत होते ? असा सवालही युझर्सनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षक आणि तरुणीवर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारे टिकटॉक व्हिडीओ तयार करणे चुकीचे आहे. किमान ठिकाणाचे तरी भान राखायला पाहिजे असे नेटकऱ्यांनी सुनावले आहे.