तिच्यासोबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याला पत्नीनं ‘रंगेहाथ’ पकडलं, पतीनं पोलिस स्टेशन परिसरातच ‘तिला’ बेदम बडवलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक इसम एका महिलेला मारहाण करत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्यप्रदेशच्या धार स्थित भागातील ही घटना आहे.
व्हिडिओमध्ये दिसणार हा पुरुष एक पोलीस अधिकारी आहे आणि संबंधित महिला ही त्याची पत्नी आहे. दुसऱ्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने रंगेहाथ पकडले. त्याचाच राग येऊन या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या पत्नीला पोलीस स्टेशन परिसरात मारहाण केली.

मारहाण करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याचे नाव नरेंद्र सूर्यवंशी आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ यात हस्तक्षेप करत या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. पुढील तपासाची अधिक चौकशी सुरु आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, हा पोलीस अधिकारी आपल्या पत्नीला केसांना पकडून खेचत आहे आणि मारहाण करत आहे. या दरम्यान उपस्थितांनी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र सूर्यवंशी याचं कुटुंब इंदोरमध्ये स्थित आहे. त्याच्या शासकीय निवासस्थानी गेल्या 2-3 दिवसांपासून एक युवती राहत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला मिळाली होती. त्यानंतर त्याची पत्नी या परिसरात पोहचली आणि तमाशा सुरु केला. या घटनेची सूचना मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.