मूल होत नसल्याने सारखं नाही तसले ‘टोमणे’ मारणाऱ्या पत्नीचा पतीकडून खून

विरार : पोलीसनामा ऑनलाईन – मूल होत नसल्याच्या कारणावरुन वारंवार टोचून बोलणाऱ्या पत्नीचा पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केला. खून केल्यानंतर चोरीचा बनाव रचणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार विरार पूर्वेकडील कोपरी नाका भागातील साहील नगरमध्ये बुधवारी घडला आहे. उमाराणी शाम गुप्ता (वय-५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

उमाराणी यांचा खून केल्यनंतर शाम गुप्ता याने घरामध्ये चोरी झाल्याचा बनाव रचला. चोरट्यांनी घरातील दागिने, रोख रक्कम चोरुन नेल्याची तक्रार त्याने पोलिसांत दिली. चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनीच पत्नीचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

शाम गुप्ता हा काम करून आणलेले पैसे पत्नीकडे ठेवण्यास देत होता. त्याने पत्नीकडे कर्जाचा हप्ता भरण्यास पैसे मागितले. मात्र पत्नीने कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला. तसेच तू काही कामाचा नाहीस, तुझ्यापासून मला मुल होत नाही असे टोचून बोलली. याचा राग आल्याने शाम गुप्ता याने पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा, लोखंडी फ्लॉवर पॉटने डोक्यात सात वार केले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला. विरार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

 …तर तुमचही नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देता येईल

 ‘पबजी’च्या वेडापायी अभियंत्याची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

घुसमट झाल्यामुळेच ‘वंचित’ मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला : लक्ष्मण माने