मास्टर ब्लास्टर ‘सचिन’चा विश्वविक्रम ‘हा’ खेळाडू ‘मोडणार’, ‘शेन’ वॉर्नने वर्तवले ‘भाकित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा विश्वविक्रम मोडीत निघू शकतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने भाकित वर्तवले आहे. वॉर्नच्या मते क्रिकेट विश्वातील एक फलंदाज सचिनचा हा विक्रम मोडीत काढू शकतो. एक मुलाखतीत बोलताना शेन वॉर्नने हे भविष्य वर्तवले.

सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडीत निघू शकतो असे म्हणणाऱ्यांना वॉर्नने हा विक्रम कोण मोडीत काढू शकते हे देखील सांगितले, तो म्हणाला की सचिनने शंभर शतकांचा विश्वविक्रम रचला होता. पण हा विश्वविक्रम मोडीत निघू शकतो आणि तो विराट कोहली मोडीत काढून शकतो. कारण आता कोहलीच्या नावावर 68 शतके आहेत आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. त्यामुळे सचिनचा शंभर शतकांचा विश्वविक्रम मोडणारा कोहलीच असेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे, सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शंभर शतके ठोकली आहेत. यात 51 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामन्यातील शतकांचा समावेश आहे.

You might also like