विराट कोहलीला दिला “कडकनाथ” कोंबडा खायचा सल्ला ; कुणी ते वाचा 

दिल्ली : वृत्तसंस्था – युवकांचा स्टाईल आयकॉन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते आता तुम्हाला जगभरात सापडतील. लहान मुलं, तरुण-तरुणी यांच्यासोबत अगदी वयोवृद्ध माणसांमध्येही विराट कोहली तितकाच लोकप्रिय आहे. तो फक्त खेळामुळेच लोकप्रिय आहे अस नाही तर त्याचा फिटनेस हि यामागे मुख्य कारण आहे, आहार आणि व्यायामा बद्दल कटिबद्ध आहे. विराट, फिटनेस संबंधी सर्वच गोष्टींना त्याच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे. कदाचित हेच लक्षात घेऊन विराट ने आता कडक नाथ कोंबडा खावा असा सल्ला पत्र पाठवून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र मध्यप्रदेश (झाबुआ) यांच्या कडून देण्यात आला असून, त्या बद्दल सविस्तर असं पत्र ही पाठवण्यात आलं आहे.

विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हे ग्रीलड चिकन खातात, याची माहिती आम्हाला मीडिया मधून कळाली, मात्र ग्रीलड चिकन मध्ये फॅट्स आमी कोलेस्ट्रॉल च प्रमाण अधिक असल्यामुळे तुम्ही मांसाहार सेवन करत नाही असं ही आम्हाला कळालं आहे असा उल्लेख त्या पत्रात केला आहे. कडकनाथ कोंबड्या मध्ये चरबी आणि कोलेस्ट्रॉल च प्रमाण कमी आहे सोबतच तो अतिशय पोषक आहे म्हणून असा सल्ला देण्यात आला आहे.

राष्ट्रीय संशोधन केंद्रानुसार झाबुआ मधील कडकनाथ कोंबड्यामध्ये फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल च प्रमाण अगदी नाहीच्या बरोबर आहे. तर त्या तुलनेत लोह आणि प्रथिनांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तुम्ही इथल्या कडकनाथ कोंबड्याचा समावेश आहारात करावा अशी विनंती झाबुआ कृषी विज्ञान केंद्राने केली आहे.

काय आहे कडकनाथ कोंबडा खाण्याचे फायदे

1) कडकनाथचे मांस अंडी खाल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो.

2) कोड फुटलेले कमी होते.
3) अटॅक व हेड अटॅकवरही गुणकारी.
4) याच्या मांसामध्ये पुरूषत्वाचे प्रमाण जास्त आहे मांस खाल्याने पुरूषत्व वाढते.
5) दमा, अस्तमा,टीबी या आजारांवरही गुणकारी.
6) प्रोटीन आनी लोह चे प्रमान 25-70%.
7) अंडी डायट अंडी म्हनुनही खाल्ली जातात.
8) मांसामध्ये प्रथीनांचे प्रमान अधीक.
9) विस्मयकारी औषधी गुणधर्म.
10) अंडी स्वादीष्ट असुन प्रथीनांचे प्रमान भरपुर आहे.
11)  बंगळुर येथील अन्न परिक्षण संशोधन संस्थेत याच्या मांसावर व अड्यांवर औषधी गुणधर्माबाबत संशोधन करण्यात आले व प्रमाणीत
केले.
12) “कडकनाथच्या” हाडांमध्ये (मेल्यानिन )नावाचे द्रव्य (पिगमेंट) अधीक प्रमानात असल्यने सर्व अवयव काळ्या रंगचे असतात. यालाच (फायब्रोमेलॅनोसिस) असेही म्हनतात.
13) या कोबडीमध्ये इतर कोंबडीच्या तुलनेत ( 21%) “लॅबीलीक” एॅसीडचे प्रमाण अधीक ( 24% ) असल्याने ह्रदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहीण्या जाड होवुन आतील मार्ग अरूंद होण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी (अटॅक) येत नाही.
14) या कोंबडीच्या मांस व आंडी सेवनाने ह्रदयवीकार म्हनजे ( अटॅक) टाळता येतोय.
15) प्रथीनांचे प्रमान 25% असते.
16) मांसामध्ये ( कोलेस्टोराॅलचे ) प्रमान इतर कोंबडीच्या तुलनेत(32 मिलीग्रॅम) प्रती 100 ग्रॅम ऐवढे आहे.
17) याच्या सेवनाणे रक्ताचा कर्करोग ,दीर्घकाळ टीकणारे त्वचेचे विकार
(ल्युकोडर्मा), पांढरे डाग, ह्रदयाचे विकार, कमी होतात असा दावा (अन्न परीक्षण केंद्र बंगळूर) यांनी केला आहे.

या बद्दल विशेष म्हणजे हा कोंबडा पूर्णपणे काळा असतो म्हणजेच हाडं काळे रंग काळा इतकंच नाही तर याचं रक्त ही काळं असत..