विराट कोहलीची ‘कॅप्टन’शीप धोक्यात ! ‘या’ खेळाडूची वर्णी लागणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये झालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता बीसीसीआय कडक पावले उचलणार आहे.

कप के बाद कोहली की कप्तानी पर भी खतरा, रोहित पर विचार कर सकती है BCCI

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाच्या कर्णधारपदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा याला एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. त्याचबरोबर विराट कोहली यांच्याकडे कसोटी सामन्यांचे कर्णधारपद तसेच ठेवले जाऊ शकते.

कप के बाद कोहली की कप्तानी पर भी खतरा, रोहित पर विचार कर सकती है BCCI

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघात मोठे बदल केले जाऊ शकतात. जर असे घडले तर विराट कोहलीला हा मोठा झटका समजला जात आहे. लवकरच यासाठी प्रक्रिया सुरु केली जाणार असून रोहित शर्माकडे एकदिवसीय आणि टी -२० सामन्यांचे कर्णधारपद देण्याची ही योग्य वेळ असल्याचे देखील या अधिकाऱ्याने सांगितले. त्याचबरोबर तो यासाठी मानसिकरीत्या तयार देखील आहे. यासाठी विद्यमान कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने पाठिंबा द्यायला हवा. त्याचबरोबर कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यात सुरु असलेल्या वादाबाबत त्यांनी स्पष्ट नकार देत असे काहीही नसल्याचे सांगितले.

कप के बाद कोहली की कप्तानी पर भी खतरा, रोहित पर विचार कर सकती है BCCI

लवकरच याबाबत एक समीक्षा बैठक होणार असून लवकरात लवकर याबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

कप के बाद कोहली की कप्तानी पर भी खतरा, रोहित पर विचार कर सकती है BCCI

दरम्यान, या स्पर्धेनंतर आता भारतीय संघ १ ऑगस्टपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात तीन एकदिवसीय, ३ टी -२० तसेच ३ कसोटी सामने खेळणार आहे.

कप के बाद कोहली की कप्तानी पर भी खतरा, रोहित पर विचार कर सकती है BCCI

 गोरी त्वचा हवी असेल तर करा हे घरगुती उपाय

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

हृदयाच्या रक्तवाहिनी च्या आजारामुळे होतात छातीत वेदना

आरोग्यदायी जीवनासाठी नियमित दूध घ्यायलाच हवे

चांगल्या आरोग्यासाठी जीम मध्ये जाण्यास वेळ नसेल तर ‘हे’ करा

सावधान ! समुद्रात आंघोळ करणार असाल तर हे तुमच्यासाठीच आहे, जरूर वाचा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like