विराटच्या ‘त्या’ डान्सचे चाहत्यांकडून ‘कौतूक’, कोहलीने सांगितलं ‘सत्य’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात विडिंजवर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ५९ धावांनी मात करत विजय मिळवला. यात छाप सोडली ती कर्णधार विराट कोहलीने आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने. विराटने या सामन्यात दमदार खेळी करत १२५ बॉलमध्ये १२० धावा केल्या. या दमदार खेळीत त्यांने १४ चौकार आणि १ षटकार ठोकला. यामुळे त्याचे सध्या कौतूक करण्यात येत आहे. परंतू याशिवाय तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे ते म्हणजे तो मैदानावर करत असलेल्या डान्समुळे.

सध्या भारत विरुद्ध विंडिज असा सामना रंगला आहे. या सामन्या दरम्यान कोहलीने केलेल्या डान्समुळे तो चर्चेत आला आहे. यावरच भारताचा फलंदाज युझवेंद्र चहल यांनी त्याला हा प्रश्न विचारला. चहल म्हणाला की, सध्या शतक ठोकत असल्याने तू चाहत्यांकडून वाहवा मिळत आहेस, परंतू याशिवाय तू मैदानावर करत असलेल्या डान्समुळे चर्चेत आहेस. तू असा अचानक मैदानात का नाचतोस?

या प्रश्नाला उत्तर देताना विराट कोहलीने सांगितले की, डान्स करता येणे हा मला मिळालेला आशीर्वाद आहे. मी कर्णधार असो वा नसो, मी नेहमी मैदानावर असताना खेळाचा आनंद लुटतो. कर्णधार असलो तरी मी त्या गोष्टीचे दडपण घेत नाही. देवाच्या कृपेने भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे, तर त्याचा मी पूर्ण आनंद घेत खेळतो. मी माझ्या आयुष्यात खूप चांगल्या टप्प्यावर आहे, म्हणून मी मैदानावर बिनधास्त डान्स करतो.

पुढे बोलताना विराट म्हणाला की, गाणं कोणतही असो मला नाचताना भांगड्याच्या स्टेप्स करायला खूप आवडतात. पण गाण खूपच वेगळं असेल तर मी त्या गाण्यावर मला हवे तसे नाचतो.

आरोग्यविषयक वृत्त