Vishal Agarwal On Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मुलाला गाडी देऊन चूक केली’, विशाल अग्रवालची पोलीस कोठडीत कबुली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vishal Agarwal On Porsche Car Accident Pune | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agarwal Builder) याच्या मुलाने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्शे कार चालवत एका बाईकला जोरात धडक दिली. यामध्ये आयटी इंजिनिअर असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला (Kalyani Nagar Accident). या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर फरार झालेल्या विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील छोट्या लॉजमधून अटक केली.

विशाल अग्रवाल याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवाल याने चुकीची कबुली दिली आहे. अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चुकीचं केलं असल्याची कबुली देत झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल याने खंत व्यक्त केली.

पोलिसांनी बुधवारी विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी पुणे पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलांनी विशाल अग्रवाल यांच्यासह तीन आरोपींची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विशाल अग्रवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तसेच अल्पवयीन मुलाला मद्य देणारा बार चालक जितेश शेवनी व जयेश बोनकर यांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पुणे पोलिसांचा न्यायालयात युक्तीवाद

वेदांतला त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी पार्टीला परवानगी दिली होती. विशालने मुलाकडे गाडी चालवण्याचा परवाना नसताना त्याला गाडी चालवण्यास दिली, असा युक्तीवाद पुणे पोलिसांनी केला. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा विशाल अग्रवाल पुण्यात होता. परंतु विशाल अग्रवाल पुण्यात नसून बाहेर असल्याचे सांग्यात आलं. फरार विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथे सापडला अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे.
मोबाईलचा तपास करुन जप्त करायचा आहे. त्यामुळ विशालची सात दिवसांची कोठडी देण्यात यावी,
अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली. तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.
महागड्या गाडीची अजून नोंद नाही, असा युक्तीवाद पोलिसांनी केला. (Vishal Agarwal On Porsche Car Accident Pune)

दरम्यान, पुण्यात पत्रकारांना माहिती देताना, आरोपीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले,
ज्युवेनाइल जस्टिस ऍक्टमध्ये आरोपी चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ (CCL)
हा अल्पवयीन मानायचा की प्रौढ हे ठरवण्याची प्रक्रिया आहे.
ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास 90 दिवस लागतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ujani Dam Backwater Boat Accident | उजनी जलाशय बोट दुर्घटनेतील बेपत्ता 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, कुटुंबियांचा आक्रोश

Pune Crime Branch | पुणे : गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराला अटक, दोन पिस्टल व चार राऊंड जप्त