Vitamin D Deficiency | केस गळत आहेत का? थकवा जाणवतोय? ‘व्हिटॅमिन डी’ची असू शकते कमतरता, वेळीच व्हा सावध

नवी दिल्ली : Vitamin D Deficiency | अनेकदा शरीरात काही बदल आणि समस्या होतात, परंतु याचे कारण समजत नाही, ज्यामुळे छोटी समस्या मोठी बनते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सुद्धा शरीरात अशीच समस्या होऊ शकते (Vitamin D Deficiency). हेल्थलाईन डॉट कॉम नुसार, शरीरात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया (How to Recognize Vitamin D Deficiency).

थकवा जाणवणे

खूप थकवा जाणवत असेल तर शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे असे होऊ शकते. शरीरातील एनर्जी लेव्हल कमी होऊ लागल्याने थोडेसे काम केले तरी थकवा येतो. (Vitamin D Deficiency)

वारंवार आजारी पडणे :

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे व्यक्ती वारंवार आजारी पडू शकतो. कारण इम्युनिटी कमी होते, सर्दी, ताप, खोकला आणि सर्व प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका वाढतो.

हाडे आणि नसांमध्ये वेदना :

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे, सांधे, कंबर आणि नसा दुखतात. शरीराच्या नर्व्ह सेल्समध्ये असलेल्या व्हिटॅमिन डी ला नोसिसेप्टर्स म्हणतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, नोसिसेप्टर्स कमी होऊ लागते, ज्यामुळे स्नायू दुखतात.

एंग्जायटी :

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डिप्रेशन आणि एंग्जायटीला बळी पडू शकता. शरीरातील व्हिटॅमिन डी कमी झाल्याने तणावाची पातळी वाढल्याने असे होते.

वजन वाढणे :

वजन वाढत असेल तर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन डी कमी होऊ लागते,
तेव्हा पोटाची चरबी आणि वजन वाढू लागते.

केस गळणे

काही वेळा केसगळतीचे कारण सुद्धा शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते. हे याच्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे.
शरीरात व्हिटॅमिन डी ची लेव्हल कमी झाल्याने केस कमकुवत होतात. त्यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | कोंढवा : बंदुकीच्या गोळी सारखी पुंगळी आढळून आल्याने खळबळ