Vitamin D Deficiency | कोणत्या लोकांमध्ये जास्त असते ‘व्हिटॅमिन-डी’ची कमतरता? ही लक्षणे पाहून सहज ओळखा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीराला अनेक प्रकारची व्हिटॅमिन (Vitamins) आणि पोषक तत्वांची (Nutrients) गरज असते. व्हिटॅमिनचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक व्हिटॅमिन डी (Vitamin D) आहे. इतर सर्व व्हिटॅमिनव्यतिरिक्त, आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची खूप गरज असते (Vitamin D Deficiency). व्हिटॅमिन डी हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होते (Vitamin D Deficiency).

 

पण आजच्या धावपळीच्या जीवनात बहुतांश लोकांमध्ये ‘डी’ व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin D Deficiency) दिसून येते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. व्हिटॅमिन डीशी संबंधित सर्व गोष्टी आणि कोणत्या लोकांमध्ये त्याची सर्वात जास्त कमतरता असते ते जाणून घेवूयात…

 

व्हिटॅमिन डीची कमतरता म्हणजे काय (What Is Vitamin D Deficiency) ?
Vitamin D च्या कमतरतेचा अर्थ असा आहे की शरीरात या विशिष्ट व्हिटॅमिनचे प्रमाण खूपच कमी असणे. शरीर सूर्यप्रकाशाच्या (Sunlight) संपर्कात राहून व्हिटॅमिन डी बनवते. पण आजच्या काळात लोकांच्या त्वचेवर सूर्यप्रकाश फारच कमी पडतो, त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी बनवता येत नाही आणि त्यामुळे त्याची कमतरता शरीरात सुरू होते.

 

‘व्हिटॅमिन डी’ का आवश्यक (Why Vitamin D Necessary) ?
व्हिटॅमिन डी हाडे आणि दातांसाठी (Bones And Teeth) खूप महत्वाचे आहे. मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेला मुडदूस म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये हाडे खूप कमजोर होतात आणि सहजपणे तुटतात.

 

त्याच वेळी, प्रौढांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) किंवा हाडे पातळ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हाडे सहज तुटू लागतात.

हाडे मजबूत करण्याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डी इतर महत्त्वपूर्ण कार्ये देखील करते जसे की-

– स्नायूंचे आरोग्य मजबूत करते (Strengthens Muscle Health)
– इम्युनिटी मजबूत करून संसर्गाशी लढण्यास मदत करते (Helps Fight Infection By Strengthening Immunity)
– अनेक प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण करते (Protects Against Many Types Of Cancer)
– नैराश्य आणि खराब मूड बरा करते (Cures Depression And Bad Mood)
– ऊर्जा पातळी राखते (Maintains Energy Level)

 

व्हिटॅमिन डीचे स्त्रोत (Sources Of Vitamin D)

– ऑयली फिश (Oily Fish)
– अंड्यातील पिवळा बलक, रेड मीट आणि लिव्हर (Egg Yolk, Red Meat And Liver)
– कॉड लिव्हर ऑईल (Cod Liver Oil)

 

शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Vitamin D Deficiency In The Body)

 

1. लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Vitamin D Deficiency In Children) –

लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या गंभीर कमतरतेमुळे मुरडून येणे
फेफरे
श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.

 

2. मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे –

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस होऊ शकतो.
हाडे खूप नरम आणि कमकुवत होतात.
मुलांच्या पायात वाकडेपणा येतो आणि चालण्यासही त्रास होतो.
लहान मुलांचे दात सहज तुटू लागतात.
दुधाच्या दातांवरही परिणाम होतो.

 

3. प्रौढांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे (Symptoms Of Vitamin D Deficiency In Adults) –

प्रौढांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे थकवा येतो
वेदना होतात.
पायर्‍या चढताना त्रास होतो.
स्नायू दुखण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागते.
हाडांचे दुखणे अनेकदा पाठीच्या खालच्या भागात, कूल्हे, ओटीपोटात, नितंब आणि पायांमध्ये दुखते.

या लोकांमध्ये सर्वाधिक आढळते व्हिटॅमिन डीची कमतरता (Vitamin D Deficiency Is Most Common In These People)

1. ऑफिसला जाणार्‍यांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सर्वाधिक धोका असतो. कार्यालयात जाणार्‍यांना उन्हात बसायला वेळ मिळत नाही. त्यामुळे या लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता खूप जास्त आढळते.

 

2. पन्नास वर्षांहून जास्त वय झाल्यावर शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासते, त्यापैकी व्हिटॅमिन डी देखील एक आहे. या वयात शरीर सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी तयार करू शकत नाही. यामुळे अशा लोकांना शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता इतर मार्गाने पूर्ण करणे आवश्यक आहे.

 

3. NIH च्या अहवालानुसार, ज्या लोकांचा बॉडी मास इंडेक्स (Body Mass Index) 30 पेक्षा जास्त आहे किंवा शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त आहे त्यांना देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.

 

वयानुसार व्हिटॅमिन डी कोणाला किती आवश्यकता (How Much Vitamin D Does Need According To Age)

0-12 महिने- 10mcg
1-13 वर्षे- 15mcg
14 -18 वर्षे- 15mcg (गरोदर महिलांसाठी 15mcg)
19-50 वर्षे- 15mcg (गरोदर महिलांसाठी 15mcg)
51-70 वर्षे- 15mcg

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Vitamin D Deficiency | vitamin d deficiency is most found in these people know its causes symptoms and sources
 
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anxiety Relief Tips | तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास पाणी सुद्धा कमी करते अस्वस्थता आणि चिंता?

 

Bad Cholesterol Lowering Foods | कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश; होणार नाहीत हृदयाचे आजार

 

Maharashtra Police | आता सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्तांनाही नाईट ड्युटी ! पोलीस आयुक्तही करणार ‘नाईट ड्युटी’