कोरोना संसर्गात मृत्यूचा धोका कमी करते ‘ही’ एक गोष्ट, NIMS स्टडीमध्ये दावा

नवी दिल्ली : व्हिटॅमिन शरीराला निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका पार पाडते. व्हिटॅमिनच्या कमतरतेने शरीरात अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. कोरोनाच्या या काळात रोज अनेक रिसर्च आणि स्टडीज समोर येत आहेत. अशावेळी व्हिटॅमिन डी बाबत सुद्धा एक मोठा प्रश्न समोर आला आहे की, व्हिटॅमिन डीची (Vitamin D) हाय लेव्हल, कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका कमी करू शकते का, आणि संक्रमित रूग्णांना व्हिटॅमिन डी (Vitamin D) दिल्याने मृत्यूदर कमी होऊ शकतो का?

सिकंदराबादच्या गांधी हॉस्पिटलच्या कोविड संक्रमित रूग्णांवर निजाम इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एनआयएमएस) च्या डॉक्टरांनी केलेल्या एका अभ्यासात या गोष्टी दुजोरा मिळाला आहे की, व्हिटॅमिन डीची हाय लेव्हल कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका कमी करू शकते. नेचरमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, व्हिटॅमिन डी एक पोन्टेशियल इम्यूनो मॉड्यूलेटर आहे जे कोविड- 19 च्या उपचारात सहायक म्हणून भूमिका पार पाडू शकते.

एनआयएमएसचे एक अस्थिरोग तज्ज्ञ आणि स्टडीच्या लेखकांपैकी एक महेश्वर लक्कीरेड्डी यांचे म्हणणे आहे की, सीरम व्हिटॅमिन डी च्या स्तरात 80 ते 100 नॅनोग्रॅम प्रति मिली (एनजी / एमएल) पर्यंत सुधारणा केल्याने विना साईड इफेक्ट कोविड- 19 च्या इन्फ्लेमेटरी मार्करला खुप कमी करता येऊ शकते. हा स्टडी 130 रूग्णांवर केला गेला होता.

रूग्णांना व्हिटॅमिन डी (व्हीडी) आणि नॉन-व्हिटॅमिन डी (एनव्हीडी) दोन वेगवेगळ्या गटात ठेवले गेले होते. व्हीडी ग्रुपच्या लोकांना मानकानुसार उपचारासह पल्स डी थेरेपी (त्यांच्या बीएमआयच्या आधारावर 8 किंवा 10 दिवसांसाठी व्हिटॅमिन डीचे 60,000 आययू डेली सप्लिमेंट) दिली गेली. एनव्हीडी गटात येणार्‍या रूग्णांना एकच मानक उपचार दिला गेला.

जेव्हा दोन गटांच्या मधील अंतराचे विश्लेषण केले गेले, तेव्हा आढळले की, व्हिटॅमिन डीचा स्तर 16 एनजी/एमएलपेक्षा वाढून 89 एनजी/एमएल झाला होता. या रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमित रूग्णांमध्ये आढळणार्‍या इन्फ्लेमेटरी मार्करमध्ये अतिशय घट दिसून आली होती. व्हिटॅमिन डी च्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी त्या उप-गटांना गठीत केले होते, जे व्हीडी आणि एनव्हीडी रूग्णांच्या अंतर्गत निवडले होते.

त्यांना रेमेडिसविर, फेविपिराविर, इव्हरमेक्टिन किंवा डेक्सामेथासोन सारखी औषधे देण्यात आली नव्हती. शोधानुसार, व्हिटॅमिन डीचा प्रभावा समान परिणाम या उप-गटांवर सुद्धा दिसून आले.

Also Read This : 

BMC Elections : ‘…अन्यथा महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जातील’ – महापौर किशोर पेडणेकर

 

‘हा’ काढा ठरतोय रामबाण उपाय ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वजनही घटवा; जाणून घ्या

 

Supreme Court : न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले – ‘देवाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावं’

 

सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा

 

PNB ग्राहकांसाठी खूशखबर ! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा ?

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत