Vi ची बंपर ऑफर ! ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळेल 56 दिवसांसाठी 100 GB डाटा, जाणून घ्या किंमत आणि वैधता

नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया आपल्या ग्राहकांसाठी खास रिचार्ज प्लॅन घेऊन आले आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांसाठी 100 जीबी डाटा मिळेल. तुम्ही तो 56 दिवसात वापरू शकता किंवा 10 दिवसात म्हणजे तुमच्या गरजेच्या हिशेबाने वापरू शकता. यावेळी वर्क फ्रॉम होम करत असलेल्या ग्राहकांना समोर ठेवून कंपनीने ही खास ऑफर काढली आहे. या प्लॅनची पूर्ण डिटेल जाणून घेवूयात.

जाणून घ्या प्लॅन
हा प्लॅन 351 रूपयांचा आहे. याची वॅलिडिटी 56 दिवस असेल. तसेच 100 जीबी डाटा आहे. या डाटामध्ये प्रत्येक दिवसाचे लिमिट नाही, म्हणजे कितीही डाटा वापरू शकता. हे एक अ‍ॅड ऑन पॅक आहे, जो सध्याच्या प्लॅनमध्ये जोडू शकता.

मिळतील डबल फायदे
यात डबल फायदा मिळत आहे. ज्यांना जास्त डाटाची गरज आहे, अशा लोकांसाठी कंपनीचा 351 रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लॅन फायद्याचा ठरेल.

कोणत्या राज्यात मिळेल
सध्या हा प्रीपेड प्लॅन आंध्र प्रदेश, दिल्ली, गुजरात, केरळ आणि मध्य प्रदेश सर्कलमध्येच ऑफर केला जात आहे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करणारांसाठी हा चांगला पर्याय आहे.

कॉलिंग सुविधा नाही
व्हीआयच्या या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएससारखा ऑपशन नाही.

हायस्पीड डाटाकडे ठेवा लक्ष
सर्वांसाठी डाटाची वेगवेगळी गरज असते. अशावेळी असा प्लॅन सिलेक्ट करा ज्यामध्ये तुम्हाला कमी रूपयात जास्त आणि हायस्पीड डाटा मिळू शकतो. यासाठी कोणताही रिचार्ज प्लॅन घेण्यापूर्वी एकदा तुमची गरज चेक करा.

You might also like