काेल्हापूरच्या गाेकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत चपलांचा पाऊस

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाच्या आजच्या वर्षीक सर्वसाधारण सभेत अपेक्षेप्रमाणे राडा पहायला मिळाला. आज झालेल्या सभेमध्ये सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. गोकूळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच चपलांचा पाऊस पडला. या राड्यानंतर काही मिनिटातच सभा गुंडाळावी लागली.

गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावावरून आमदार महादेव महाडिक यांचे समर्थक आणि आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आपापसात भिडले. तर काही सभासदांनी भर सभेत चपला फेकून मारत हाणामारी केली. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff832e28-c48d-11e8-95c8-4791711bbcf5′]

संघ मल्टीस्टेट करण्याचा ठराव आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर आजच्या सभेत चर्चा होणार होती. मात्र, गोकूळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याच्या ठरावाला आमदार सतेज पाटील गटाने विरोध केला. सत्ताधारी गटाने सर्व विषयांना एका मिनीटात मंजूरी दिली. यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर एकमेकांना भिडले. तुफान हाणामारी सुरु असताना काहींनी चपलां भिरकावण्यास सुरुवात केली.

[amazon_link asins=’B00IZ97K3I,B00IZ94A6S,B00N2G0428′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’106a1d4d-c48e-11e8-9dce-ef82f9d0d551′]

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरात असणाऱ्या मुख्य कार्यालयाच्या आवारात घेण्यात आली. मुख्य कार्यालयाचा परिसर लहान असल्याने इथे सभा घेऊ नये अशी मागणी यापूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी केली होती. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवत गोकूळ दूध संघाने आजची सभा याच परिसरात आयोजित केली. सभेच्या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासूनच सभासदांनी येण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच हे सभागृह तुडूंब भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेरच हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवून धरलं.
[amazon_link asins=’B00DRLAY3C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c56d92d0-c48f-11e8-a828-a52346f9e7ec’]

सभागृहाच्या बाहेर गोकूळ दूध संघाच्या गेटवर आमदार सतेज पाटील आमदार हसन मुश्रीफ आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक सभासद ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी बसले होते. तर गोकूळ दूध संघाच्या आवारामध्ये सभेला बरोबर अकरा वाजता सुरुवात झाली. याचवेळी सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी अखेर सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्यासह कार्यकर्त्यांना सभेच्या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9204694b-c48f-11e8-98e6-a9bbc2251971′]

काश्मीरमध्ये पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला

यावेळी सभासद कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सभेच्या ठिकाणी आल्याने एकच गोंधळ उडाला.  सभेमध्ये गोंधळ वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोकूळ दूध संघाच्या संचालकांनी अकरा वाजता सभेला सुरुवात केली. सभेची सुरुवात होताच यावर्षीचे १ ते १३ विषय मंजूर करा अशी विचारणा करताच बहुतांशी  गोकूळ समर्थकांनी हे सर्व विषय मंजूर असल्याचे घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या सदस्यांनी याला आक्षेप घेताच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये सभासदांमध्ये राडा सुरू झाला. घोषणाबाजी करत कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली. तर काही सभासदांनी एकमेकांवर चप्पल फेकण्यास सुरुवात केली. हाणामारी चप्पल फेकाफेकीचा हा सर्व गोंधळ पाहता पोलिसांनी तातडीने या दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला करण्यास सुरुवात केली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता एकमेकांवर तुटून पडत होते.

आपण ही सभा लोकशाही पद्धतीने घेतली आहे गोकूळच्या बहुतांश सभासदांनी हे सर्व विषय मंजूर केले आहेत. मात्र विरोधकांनी ही सभा होऊ नये यासाठी सभेत येऊन गोंधळ घातल्याची प्रतिक्रिया महादेवराव महाडिक आणि माजी आमदार पी. एन. पाटील यांनी दिलेली आहे.
[amazon_link asins=’B071CY6D29′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’782ca896-c48f-11e8-9374-31984bedeec7′]

या सगळ्या प्रकारानंतर विरोधक सभागृहाबाहेर आल्यानंतर रोडवर असणारे दुधाचे क्रेड फेकून दिले. तसेच पत्र्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एक चारचाकी गाडी आणि एक ट्रकच्या काचा फुटल्या आहेत. या प्रकारामुळे ताराबाई पार्क परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी अखेर या आक्रमक कार्यकर्त्यांना पांगवला.