Vote without Voter ID | तुमच्याकडे नसेल मतदार ओळखपत्र तरी सुद्धा टाकू शकता मत; जाणून घ्या पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vote without Voter ID | पुढील वर्षी 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुक आयोगाने सुद्धा यासाठी तयारी सुरू केली आहे. जर तुम्ही पहिल्यांदा मतदार झाला असाल आणि तुम्हाला मतदार ओळखपत्र (Voter ID Card) मिळालेले नसेल किंवा कुठे हरवले असेल तर तुम्हाला अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान करण्याची पद्धत सांगणार आहोत. (Vote without Voter ID)

 

मतदार यादीत नाव आवश्यक
यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे, याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदार यादीत नाव असेल आणि तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर निवडणुक आयोगाने 11 प्रकारच्या इतर कागदपत्रांना ओळखपत्र म्हणून मान्यता दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही मत टाकू शकतो. (Vote without Voter ID)

 

या कागदपत्रांच्या आधारावर करू शकता मतदान

1. पासपोर्ट

2. ड्रायव्हिंग लायसन्स

3. सरकारी कर्मचार्‍यांचे ओळखपत्र, खाजगी कंपनीचे फोटो ओळखपत्र

4. PAN कार्ड

5. आधार कार्ड (Aadhaar Card)

6. पोस्ट ऑफिस (Post Office) आणि बँकेद्वारे जारी केलेले पासबुक

7. MGNREGA जॉब कार्ड

8. लेबर मिनिस्ट्रीद्वारे जारी हेल्थ इन्श्युरन्स कार्ड

9. पेन्शन कार्ड ज्यावर तुमचा फोटो असेल आणि अटेस्टेड असेल

10. नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (NPR) द्वारे जारी स्मार्ट कार्ड

11. MPs/MLAs/MLCs कडून जारी अधिकृत ओळखपत्र

 

मतदार यादीत असे तपासा तुमचे नाव

प्रत्येक निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग मतदार यादी अपडेट करतो. या दरम्यान नवीन मतदारांचा समावेश केला जातो आणि कधीकधी एखाद्या मतदाराचे नाव यादीतून कापले जाते. अशावेळी निवडणुकीच्या अगोदर मतदार यादीत नाव आहे किंवा नाही हे तपासावे.

 

जर मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर निवडणूक आयोगात तक्रार नोंदवून आपल्या नावाचा पुन्हा मतदार यादीत समावेश करू शकता. मतदार यादीत नाव तपासण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

 

निवडणूक आयोगाची वेबसाइट Electoralsearch.in वर लॉगिन करा. येथे दोन प्रकारे मतदार सर्च करू शकतात.

पहिले ऑपशन नाव, जन्मतारीख आणि काही इतर माहिती टाकून आपले नाव तपासू शकता.

दुसर्‍या ऑपशनमध्ये मतदार ओळखपत्रावर दिलेला EPIC नंबरद्वारे माहिती मिळवू शकता.

EPIC नंबरला मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणतात. या नंबरद्वारे मतदार यादीत नाव तपासू शकता.

माहिती दिल्यानंतर मतदार यादी तुमच्या समोर खुली होईल आणि तुमच्या डिटेल्स तिथे असतील.

सर्व माहिती देऊनही जर माहिती समोर आली नाही तर निवडणूक आयोगाचा टोल फ्री नंबर 1800111950 वर कॉल करू शकता.

 

Web Title :- Vote without Voter ID | you do not have voter id card even then you can cast vote know process

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Astrological Medical Center | ‘या’ ठिकाणी सरकारी रूग्णालयात देशातील पहिले ज्योतिष वैद्यकीय केंद्र ! जन्मकुंडली, हस्तरेषा आणि राशिफळ पाहून आजारावर उपचार

Raigad Fort | 7 डिसेंबरपर्यंत रायगडावर पर्यटकांना प्रवेश बंदी; रायगड-अलिबाग पोलीसांची माहिती

Pune News | …तर मेट्रो प्रकल्प 2 वर्षे रेंगाळणार व खर्चही 70 कोटी रुपयांनी वाढणार ! गणेश मंडळांनी डिझाईन बदलाचा आग्रह मागे घेण्याची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून विनंती