पावसाच्या धारा झेलत काढली मतदार जनजागृती रॅली

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन

एक ऑगस्ट रोजी सांगली महापालिकेची निवडणूक आहे त्यानिमित्त आज सोमवार (दि.16) रोजी ऑगष्ट फर्स्ट…मतदान फर्स्ट…आपले मतदान…आपला स्वाभिमान…अशा मतदार प्रबोधनपर घोषणा देत ढोल ताश्याच्या आवाजात पावसाच्या धारा झेलत मतदार जनजागृती अभियानातंर्गत मतदार जागृती रॅली काढण्यात आली.
[amazon_link asins=’B076H74F8N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b5b9c8d-8917-11e8-a6df-69f14a63d4db’]

भर पावसात काढण्यात आलेल्या या मतदार जागृती रॅलीत ढोलपथक, उंच मुखवटे, मतदार जागृतीचे फलक यामुळे रॅलीचे आकर्षण वाढले. यावेळी भर पावसात काढण्यात आलेल्या रॅलीत अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी मतदारांच्या भावना पाहून पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि त्यांनी मतदारांना  मतदान हा केवळ अधिकार नसून राष्ट्रीय जबाबदारी असल्याची शपथ दिली.

महापालिका निवडणूकीसाठी मतदार जागृती व्हावी यासाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र खेबूडकर यांच्या संकल्पनेतून मतदार जागृती अभियान राबवले जात आहे, शहरातील सर्व चौकात मतदार जागृतीचे फलक लावण्यात आले होते. काल पुष्पराज चौकातून निघालेल्या या मतदार जागृती रॅलीत दामिनी या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आणि संभाजी महाराजांच्या वरील मालिकेत राजमाता जिजाऊची भूमिका करणार्‍या प्रतिक्षा लोणकर, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख सुहैल शर्मा, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त रविंद्र खेबूडकर, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपनिवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त सुनिल पवार, स्मृती पाटील आदी सहभागी झाले होते.

सांगलीत आयोजित करण्यात आलेली ही भव्य रॅली पुष्पराज चौकातून राममंदिर चौक मार्गे, काँग्रेस कमिटी, स्टेशन चौकात याचा समारोप झाला. या रॅलीत  शासकीय कर्मचारी, पोलीस, बार असोशिएशन, सर्व शाळा महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच यासह वेगवेगळ्या संघटना सहभागी झाल्या होत्या. कालच्या रॅलीत पथनाट्य, अग्निशमन गाडी, रुग्णवाहिका असा ताफा होता, मतदान जागृती रॅली पूर्णपणे मराठामोळ्या पद्धतीने काढली गेली होती.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90faf914-8917-11e8-8cb5-c531b42fab03′]

रॅलीत  कोल्हापुरचे श्रीमंत ढोलपथक हे आकर्षण होते. यात मर्दाणी खेळाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन केले गेले. स्टेशन चौकात भर पावसात अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर यांनी सहभागी लोकांना मतदानाची शपथ दिली. भारतीय घटनेने मतदान करण्याचा अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा वापर करेन, हा अधिकार नसून माझी राष्ट्रीय जबाबदारी असेल अशी शपथ दिली.

आयुक्त खेबडूकर म्हणाले, निवडणूका हा लोकशाहीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. यात मतदार केंद्रस्थानी असतो, मतदारच आपल्या गावाचे, शहराचे,पर्यायाने देशाचे भवितव्य ठरवत असतो. मतदान हा बहुमोल अधिकार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकानी मतदान केले पाहिजे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान केले पाहिजे.