जिल्‍ह्यातील बारा विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिध्‍द

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादयांच्‍या विशेष संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिध्‍द करणेबाबत निर्देशित केले होते. त्‍यानुसार जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

जिल्‍हयातील 216 अकोले (अ.ज.), 217 संगमनेर, 218 शिर्ड, 219 कोपरगाव, 220 श्रीरामपूर (अ.जा.),221 नेवासा, 222 शेवगाव, 223 राहुरी, 224 पारनेर, 225 अहमदनगर शहर, 226 श्रीगोंदा व 227 कर्जत – जामखेड या विधानसभा मतदारसंघातील 2019 च्‍या प्रारुप मतदार यादया, पुरवणी मतदार यादया – 1 सह अंतिम मतदार यादया सर्व पदनिर्देशित मतदान केंद्रांच्‍या ठिकाणी, जिल्‍हयातील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांची कार्यालये,  मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये आणि जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयामध्‍ये दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत.

अहमदनगर जिल्‍ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्‍या व त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे

अ.

क्र

विधानसभा मतदार संघाचे नाव एकूण मतदान केंद्र पुरुष मतदार स्त्री

मतदार

इतर

मतदार

 

एकूण मतदार मतदार यादीतील फोटो %

 

मतदार ओळखपत्र % मतदार यादीत स्त्री पुरुष प्रमाण

1

216-अकोले

307

131501

119222

0

250723

99.81

99.83

907

2

217-संगमनेर

278

137316

126842

0

264158

99.79

99.82

924

3

218-शिर्डी

270

133557

123531

8

257096

99.99

100.00

925

4

219-कोपरगाव

269

131593

125271

4

256868

99.99

99.99

952

5

220-श्रीरामपूर(अ.जा)

310

143577

135956

43

279576

100.00

100.00

947

6

221-नेवासा

269

133345

119784

0

253129

99.99

99.99

898

7

222-शेवगाव

361

175014

158406

2

333422

100.00

100.00

905

8

223-राहुरी

307

149967

134429

0

284396

99.95

99.96

896

9

224-पारनेर

365

163587

149887

0

313474

99.83

99.87

916

10

225-अहमदनगर शहर

289

144697

135731

72

280500

99.85

99.91

938

11

226-श्रीगोदा

344

161414

145916

4

307334

99.93

99.95

904

12

227-कर्जत-जामखेड

353

165713

146697

2

312412

99.99

100.00

885

 

एकूण

3722

1771281

1621672

135

3393088

99.93

99.94

916


विशेष संक्षिप्‍त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम घेऊन मतदार यादीतील स्‍त्री पुरुष प्रमाण 915 वरुन 916 पर्यंत वाढविण्‍यात  आले आहे. तसेच 74,533 इतकी नवीन मतदार नाव नोंदणी करण्‍यात आली असून  जिल्‍हयात तृतीयपंथी मतदारांची संख्‍या 135 इतकी आहे  व जिल्‍हयातील 99.93 % मतदारांचे फोटो मतदार यादीत असून 99.94 % मतदारांकडे निवडणूक ओळखपत्र आहेत.

आगामी लोकसभा निव्‍डणूक 2019 साठी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्‍यक आहे. त्‍या अनुषंगाने सर्व नागरिकांना जिल्‍हा निवडणूक प्रशासनाकडून आवाहन करण्‍यात येते की,  प्रत्येक मतदाराने दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्‍द झालेल्‍या  अंतिम मतदार यादित आपले नांव आहे किंवा नाही ? याची खात्री करावी.  जिल्‍हयातील नागरिकांना व मतदारांनी आपले मतदार यादीमधून चुकीने वगळले गेले असल्‍यास मतदार यादीत नांव नोंदविण्‍यासाठी फॉर्म नमुना-6 भरुन दयावा. जिल्‍हयातील मयत, दुबार व स्‍थलांतरित मतदारांची नांवे वगळण्‍यासाठी फॉर्म नमुना-7 भरुन दयावा.  दिनांक 01जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. परंतु मतदार यादीत नाव नाही अशा सर्व नागरिकांनी  आपला फॉर्म नमुना-6 म्हणजेच मतदार नांव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा व लोकशाही बळकटीकरणात सहभाग नोंदवावा असे उपजिल्‍हाधिकारी तथा उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी एका प्रसिध्‍दी पत्र कान्‍वये कळविले आहे.