राज्याच्या राज्यपालपदी विक्षिप्त माणूस बसलाय; राज्यातील ‘या’ दिग्गज महिला नेत्याचा ‘हल्लाबोल’

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय व्हावे अशी मागणी आहे. मात्र, राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे. राज्यपाल अडथळे आणत आहेत म्हणून येथे कृषी महाविद्यालये होत नाहीत ही वास्तविकता आहे, असा आरोपही ठाकूर यांनी यावेळी केला आहे.

सांगलीच्या जतमध्ये आमदार विक्रम सिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकूर बोलत होत्या. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. राज्याच्या राज्यपाल पदी बसलेल्या एका विक्षिप्त माणसामुळे अनेक अडचणी येत आहेत, असे ठाकूर म्हणाल्या. सांगली जिल्ह्यातील कृषी विद्यालयाच्या मागणीवरुन बोलताना मंत्री ठाकूर यांनी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा हवाला दिला. त्या म्हणाल्या की, इथे कृषी महाविद्यालय सुरु झाले पाहिजे, अशी मागणी होती. दादांनी मला सांगितलं आहे, एक विक्षिप्त असा माणूस राज्याच्या गव्हर्नरपदी बसला असल्याचे त्या म्हणाल्या.