मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी केलं जेरबंद

पिंपरी-चिंचवड :पोलीसनामा ऑनलाईन  – गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरीच्या घटना घडत आहेत. त्यानुसार शहरात गस्त घालण्याचे प्रमाण पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाढवले आहे. मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ४ दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले असून ७५ हजार किंमतीच्या दुचाकी वाकड पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

मयूर जगन्नाथ साचने वय-२० रा.गोरा कुंभार वसाहत ताथवडे आणि मेघराज नरसिंग शिंदे (१९) रा.वाल्हेकरवाडी चिंचवड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीश माने हे कर्मचाऱ्यासह परिसरात गस्त घालत होते,तेव्हा त्यांच्या सहकार्याला वाकड परिसरातील ताथवडे येथे दोन अनोळखी संशयित रित्या दुचाकीवर थांबल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाऊन चौकशी केली असता त्यांनी चार दुचाकी चोरल्याचे कबुली दिली.दुचाकी चोरून ते आलेल्या पैशात मौज मजा करायचे अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.