Walking Health Benefits | शारीरिक-मानसिक तंदुरुस्तीसाठी चालणे खूप आवश्यक; पण कुठेतरी या चुका करत नाही ना?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Walking Health Benefits | शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायाम (Yoga And Exercise) करावा. व्यायाम केल्याने शारीरिक हालचाली वाढतात त्यामुळे अवयवांमध्ये रक्ताभिसरण होण्याबरोबरच स्नायू निरोगी राहतात (Walking Health Benefits). वेळेअभावी बहुतांश लोकांना रोज व्यायाम करणं थोडं कठीण होत असलं तरी अशा लोकांना नियमित चालण्याची सवय लावून घेणंही खूप फायद्याचं ठरू शकतं (Take Care These Things While Walking).

 

चालण्याची सवय शरीराच्या बहुतेक सर्व मोठ्या स्नायूंमध्ये क्रियाशीलता वाढवण्याबरोबरच फिटनेस राखण्यास खूप उपयुक्त ठरते. सध्याच्या काळातील आजारांकडे पाहिले तर बहुतांश समस्यांसाठी सेंटेंशियल लाइफस्टाइल (Centennial Lifestyle) अर्थात बैठी जीवनशैली हा मुख्य घटक म्हणून पाहिला जातो. दररोज काही काळ चालण्याची सवय आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज चालण्याची सवय देखील शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याच्या समस्या कमी करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो (Walking Health Benefits).

 

चला जाणून घेऊया दररोज चालण्याचे फायदे आणि त्यासंबंधीच्या चुकांबद्दल (Let’s Know About The Advantages And Disadvantages Of Walking Every Day).

चालण्याची सवय लावा (Get Habit Of Walking) :
रोज चालण्याची सवय तुमचं शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. दिवसातून किमान ३० मिनिटे चालल्यास कोरोनरी हृदयरोगाचा धोका (Risk Of Coronary Heart Disease) सुमारे १९ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. आपण दररोज चालण्याचा कालावधी किंवा अंतर वाढविल्यास, हा धोका आणखी कमी असू शकतो. शारीरिक आरोग्याबरोबर चालण्याची सवय मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरते. शिवाय यामुळे चिंता, नैराश्य आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होऊ शकते.

दररोज चालण्याचे फायदे (Benefits Of Daily Walking) :

दररोज वेगवान चालण्यासारखे सोपे व्यायाम देखील आपल्याला निरोगी जीवन जगण्यास मदत करू शकतात. रोज चालण्याची सवय लावून तुम्ही असे फायदे मिळवू शकता.

योग्य वजन टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीराची चरबी कमी करण्यास उपयुक्त.

हृदयरोग, पक्षाघात, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि टाइप-२ मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती सुधारण्यासाठी उपयोगी.

हाडे आणि स्नायू बळकट करतात.

स्नायूंचा स्टॅमिना सुधारतो.

ऊर्जेची पातळी वाढते.

मूड, कॉग्निशन, स्मरणशक्ती आणि झोप सुधारते.

हे शारीरिक संतुलन आणि समन्वयात चांगले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते.

 

अशा चुका करू नका (Don’t Make Such Mistakes) :

अनेकदा असे दिसून येते की, चालताना लोक अशा अनेक चुका करतात ज्यामुळे शरीराला प्रकारे हानी पोहोचू शकते.

प्रथम, डोके टेकवू नका.

आपले डोके, मान, पाठ आणि खांदे सरळ स्थितीत ठेवा जेणेकरून आपण योग्य प्रकारे श्वास घेऊ शकाल.

चालताना चॅटिंग, फोनवर ब्राउजिंग अशा इतर अ‍ॅक्टिव्हिटीज टाळा. त्यामुळे एकाग्रता कमी होते. -चालल्यानंतर पायाचे स्नायू थोडे ताणून घ्या.

चालण्यासाठी सुरक्षित टिपा (Safe Tips For Walking) :

चालताना आपली सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या उपायांची काळजी घ्या.

संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला जा.

पाय रिलॅक्स होतील असे शूज घाला.

सैल, आरामदायी कपडे घालावेत.

हायड्रेटेड राहण्यासाठी फिरायला जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्या.

उन्हापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीनने चाला.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Walking Health Benefits | walking health benefits in marathi take care these things while walking

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Morning Breakfast Tips | सकाळी उठल्यावर करा ‘या’ पेयांचे सेवन, सगळे आजार होतील दूर; जाणून घ्या

 

Home Remedies For Straight Hair | ‘हे’ घरगुती उपाय करून करा आपले केस सरळ; जाणून घ्या

 

Benefits And Side Effects Of Tea Consumption | चहा प्यायल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो का? त्याचे फायदे-तोटे जाणून घ्या