पुण्यातील गणेश पेठेत वाड्याची भिंत कोसळली

पुणे : पोलीसनामा ऑनालइन – गणेश पेठेतील ढोर गल्लीतील जुन्या वाड्याची भिंत मध्यरात्री कोसळली़ सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मायलेकराचे प्राण वाचले.

बोरा हॉस्पिटलजवळ हा जुना वाडा आहे. त्यात आई आणि मुलगा राहतात़ मध्यरात्रीच्या सुमारास वाड्याची भिंत पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ ते पाहून आई व मुलगा तातडीने बाहेर पळाल्याने वाचले़
अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहचले़ दोघेही अगोदरच बाहेर पडल्याने कोणतीही जिवित हानी झाली नाही़.

पुण्यातील जुन्या वाड्यांचा प्रश्न अजूनही तसात असल्याने गेल्या काही दिवसात दोन तीन दिवसाआड एखाद्या जुन्या वाड्याची भिंत कोसळून लोक आत अडकण्याचे प्रसंग घडत आहे़ अजूनही शहरातील काही धोकादायक वाड्यांमध्ये लोक रहात आहेत़ पावसाचा जोर असल्याने या जुन्या वाड्याच्या भिंतीमध्ये पाणी मुरून त्या अधिक धोकादायक झाल्या आहेत़ त्यामुळे कधी कोणत्या वाड्याची भिंत पडेल, हे सांगता येत नाही अशी शहरातील अवस्था आहे.

You might also like